Thursday, April 3, 2008

"प्रवाही"चा प्रभावी आविष्कार पुणेकरांनी अनुभवला

पुणे- प्रयोगशिल राहून नवनिर्मिती करणाऱ्या चैतन्य कुंटे,शांभवी वझे,पुष्कर लेले,चारूदत्त फडके यांनी प्रवाहीची संकल्पना मैफल गरवारे महाविद्दयालयाच्या सभागृहात नुकतीच सादर केली. भारतीय संगीत परंपरेची विविध रूपे यात दिसतात. नुकतेच या कलाकारांनी ऑस्ट्रेलिया अमि सिंगापूरचा दौरा केला. पुण्यातला हा पहिला प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला आणि दादही मिळाली. वेदकालिन सांगायनाच्या परंपरेपासून अलिकडच्या काळातील्या नाट्यसंगीत,भावसंगीतारर्यंतच्या वाटचालीचा हा नृत्य-संगीताच्या माध्यमातून रंगलेला आविष्कार.अस्वादकाला प्रवाहीच्या या संकल्पनेतून फेरी मारून आणतात ते हार्मोनियम वादक अणि संगीतकार चैतन्य कुंटे .संगीतल्या जाणकाराला अणि रसिकालाही आनंद देणारा हा कार्यक्रम. संहीताही त्यांचीच.कार्यक्रमात जिवंतपणा आणलाय तो पुण्याची कथ्थक नृत्यकलाकार शांभवी वझे आणि तरूण गायक पुष्कर लेले यांनी. सामगायन,प्रबंध,ध्रुपद.ख्याल,ठुमरी,टप्पा,तराणा आणि नाट्यसंगीतातून पुष्करने कौशल्य ओतले. नृत्त आमि नृत्यातून तालप्रस्तुती,जुगलबंदी,होरी,चतरंग,ठुमरीतून शांभवीने शैलीदार नृत्याची कमाल अदाकारी सादर करून जाणकारांच्या टाळ्यांनी दाद मिळविली. मैफलीची तबला साथ चारूदत्त फडके यांची होती तर हार्मोनियमवर स्वतः कुंटेयांनी सूरावट साकारली.
प्रवाहीचा पुढला काय्रक्रम काय नवीव देणार याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमाचा काही भाग पाहण्यासाठी इथे क्‍लिक करावे.

No comments: