Friday, May 16, 2008

मोठी स्वप्ने बघीतली तरच काहितरी चिमटीत येते....केदार शिंदे

राज ठाकरे चांगले चित्रपट दाखवितात. चांगले संगीत ऐकवतात. चांगली पुस्तके वाचायला देतात. त्यांच्या कडून जे करशिल त्याचा भव्यतेने विचार कर. मोठी स्वप्ने पहायला त्यांनी शिकविले. योग्य वेळ येताच आपण राजकारणात येणार असल्याचे सूतोवाचही केदारने बोलता बोलता केले.
सध्या मी काही काळ थांबलोय. पहातोय. बघतोय. विचार करतोय. थोडी विश्रांती घेतोय.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
केदार शिंदे डीएसके गप्पात बोलत होते. दिलखुलास.राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीतून गंगाधर टिपरे ही मालिका आणि सही रे सही वर बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. सुनिल बर्वे,ऋजुता देशमुख आणि निलम शिर्के यांच्याशी गप्पांचे आयोजन केले होते. पण केदार शिंदे यांच्या मुलाखतीचा प्रभावामुळे इतर कलावंत इथे पुरेसे बोलके होऊ शकले नाहीत.
"अंकुश चौधरी साडे माडे तीन म्हणून दिग्दर्शक बनून आपल्याच पोटावर पाय आणतोय हा विनोदी संवादही केदार यांनी ऐकविला. अंकुशला चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टी शिकायची इच्छा होती. तो "अग बाई ..अरेच्चा"चा सहाय्य्‌क दिग्दर्शकही होता. भरत जाधव दिलेले काम चोख पार पाडणार." केदार मैत्रीचे दिवस आठवताना आजही रोमांचित होतो. सध्या हे त्रिदेव एकमेकांना भेटणेही कठीण झालेय,असा शेराही केदारने मारलाय.
सही रे सही'ने १९००प्रयोगांचा टप्पा गाठलाय. ट्रिक्‍स ट्रिटमेट देऊन नाटकात प्रेक्षकांना गुंतविण्याची ताकद आहे. मी नाटकाची आई असलो तर भरत जाधव बाप आहे. हे मुल आमच्या दोघांचे आहे. लेखक म्हणून नाटक ग्रेट नाही. हे नाटक हा प्रेक्षकाला चकवा देण्याचा भाग आहे. रिमोटच्या तडाख्यात अडकलेल्या मराठी प्रेक्षकांना रंगमंचाकडे आणण्यात मी यशस्वी ठरलोय. याचे श्रेय नक्कीच केदारला जाते.
आज मागे वळून पाहताना मराठी मातीतले शाहिर साबळेंचे संस्कार घेऊन वेगळे देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तीन चित्रपटानंतर नव्या ऑफर्स येताहेत. चांगलं करायची इच्छा आहे. मात्र बजेट निर्माते वाढवत नाहीत. भव्य स्वप्न सत्त्यात आणण्याची मनिषा नक्की आहे. गंगाधर टिपरेने कुठे थांबायचे ते शिकविले.
आत्ता केदार फक्त पहातोय. पण फिनिक्‍स पक्षाप्रमाणे त्याने घेतलेली नवी भरारी तुम्हाला नक्की दिसेल. असा तुम्हा-आम्हाला विश्वास आहे. आपणही इथच थांबूया !.

No comments: