Sunday, May 18, 2008

फिरोज दस्तूर कलाकार म्हणून श्रेष्ठच पण माणूसही......

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि एके काळचे चित्रपट कलावंत पं.फिरोज दस्तूर यांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या मोठेपणाच्या आठवणी सांगण्यात आल्या. पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांचे मोठेपण प्रत्येकाच्या बोलण्यातून प्रकट होत होते.

कार्यक्रमाची व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात त्यांच्या स्मृतीला आभिवादन केले गेले. त्यांचे पुतणे रूस्तुम दस्तूर हे अमेरिकेतून या कार्यक्रमाला हजर होते.त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पं.भिमसेन जोशी तब्येत बरी नसल्याने हजर राहू शकले नाहीत. पण त्यांचे सुपूत्र श्रीनिवास जोशी यांनी शव्दात अणि गायनाद्वारे किराणा घराण्याच्या श्रेष्ठ गायकाला विनम्रपणे आदरांजली वाहिली.
त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी आणि श्रीकांत देशपांडे यांनी स्वराने त्यांच्या गायनकलेला अभिवादन केले.
त्यांच्या नावे मुंबई विद्यापिठात स्वतंत्र चेअर निर्माण करून त्यांची स्मृती कायम रहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ज्येंष्ठ पत्रकार आणि संगीताचे जाणकार रामभाऊ जोशी यांनी केले, उस्मान खान, डॉ.सतीश कौशिक, नाथ नेरळकर, सत्यशिल देशपांडे यांनी आपल्या भाषणात दस्तुरांच्या आठवणीतून आणि गुरू म्हणून केलेल्या कार्याची महती वर्णन केली

No comments: