Saturday, June 28, 2008

बालगंधर्व रंगमंदिराची चाळिशी!

पुणे शहराची ओळख सांगणाऱ्या नावातले एक नाव म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. चाळीस वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या रंगमंदिरात नांदी झाली आणि पुण्याच्या वैभवात एक नाव सामावले गेले.
रंगमंदिराच्या वैभवाला साजेसा सोहळा २५ आणि २६ जूनला साजरा झाला.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे किलक करा.


सोहळ्यानिमित्ताने पुण्यातले सारे कलावंत आणि नाट्य आणि संगीत कार्यक्रम सादर करणारे कलावंत एकत्र आले. एकाच वेळी ही किमया घडू शकली, त्याचे कारण बालगंधर्व रंगमंदिरावरचे सर्वांचे प्रेम. बालगंधर्वच्या तारखा मिळण्यासाठी नेहमीच चढाओढ असते. कारण कलावंतांना येथे कला सादर करताना आनंद होतो, रसिकांना येथे यावेसे वाटते, असा हा दुहेरी आनंददायी प्रवास.
दोन दिवस वालगंधर्वांच्या नावाचा उदो उदो झाला. बालगंधर्वांच्या वैभवाची अणि त्या काळच्या संगीत नाटकांची परंपरा पुन्हा सांगितली गेली.

बालगंधर्वांच्या नावाने पुणे महापालिकेने दिलेला पुरस्कार शरद गोखले यांना शानदार सोहळ्यात दिला गेला.
प्रदर्शन, रक्तदान आणि संगीत कार्यक्रमांनी चाळिशीचा सोहळा रसिकांनी अनुभवला. महापालिकेने रंगमंच मोफत उपलब्ध करून दिला. निर्माता आणि व्यवस्थापक संघाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.
लावणी, ऑकेस्ट्रा, संगीत नाटक यातून रसिकांना आनंद दिला गेला. रसिकांची दादही तितकीच मिळाली.
पुरस्कार सोहळ्याच्या अगोदर बालगंधर्वतून निघालेल्या मिरवणुकीला विशेष महत्त्व होते. यात सारथ्य केले ते बाबासाहेब पुरंदरे, नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर आणि लीला गांधी यांनी.


संस्थेच्या इमारतीचा आणि त्यातही पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा सोहळा पाहून रसिकांनाही धन्यता वाटली.

No comments: