Friday, August 22, 2008

पुरूषोत्तम करंडकाची प्राथमिक फेरी उत्साहात सुरू

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील नाट्यगुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पुरूषोत्तम करंडक महाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मंगळवार पासून उत्साहात सुरवात झाली. महाराष्ट्रीय कलोपासक ,पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे ४६ वे वर्ष आहे.

उत्साही वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी इथं क्‍लिक करा.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या ४३ महाविद्यालयांच्या ४४ एकांकिका भरत नाट्य मंदिरात होतील. ही फेरी ३१ ऑगस्ट पर्यंत चालेल. रोज संध्याकाळी पाच वाजता आणि रविवारी केवळ दोन सत्रात ही प्राथमिक फेरी होत आहे.अंतिम फेरी २० आणि २१ सप्टेंबरला तर पारितोषिक वितरण समारंभ नाट्यसंमेलनाध्यक्ष रमेश देव यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला भरतलाच होणार आहे.
दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना या एकांकिकेच्या सर्वच बाबी विद्यार्थ्यांनीच कराव्यात असा या स्पर्धेचा नियम आहे. यंदा २३ एकांकिका विद्यार्थ्यांनी लिहल्या असल्याची माहीती संस्थेचे सरचिटणिस हेमंत वैद्य यांनी दिली.
कांही विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला.
कडक शिस्तीसाठी ही स्पर्धा प्रसिध्द आहे. तिसऱ्या घंटेनंतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
सादरीकरण करणारे आणि पाहणारे सारेच उत्साहात असतात. प्राची घाटपांडे, प्रदिप वैद्य अणि उदय लागू हे प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत.
पुरूषोत्तमच्या स्पर्धेत भाग घेतलेले अनेक कलावंत आज कलाक्षेत्रात चमकले आहेत.

No comments: