Friday, April 4, 2008

वलयांपासून दूर ....संगीत क्षेत्रातील "चिराग"पं.कमलाकरबुवा जोशी

श्रीराम संगीत विद्यालयाच्या माध्यमातून गेली पन्नास वर्षे गायन-वादनाचे शिक्षण देणाऱ्या या संगीत गुरूचे नाव आहे कमलाकर जोशी.लहानपणापासून दृष्टी गेलेल्या या जिद्दी गुरूची ही गोष्ट.वयाची ७१ वर्षे झाली.आजही डोळसांना लाजविल असा आत्मविश्वास बाळगून ते संगीत कलेत अनेक शिष्य पारंगत करीत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रभात फेरीतल्या राष्ट्रजागृतीच्या गीतांची प्रंरणा घेवून त्यांची ओढ गायनकलेकडे झुकली.बहिणीच्या मदतीने आणि माता-पित्यांच्या छत्राखाली संगीताच्या प्राथमिक शिक्षणाला सुरवात केली.नाशिकला खरवंडीकरबुवांच्या सहवासात आले अणि त्यांच्या संगीत केलेचा विस्तार झाला.दृष्टी नसूनही गायन-वादनाची साथ भवितव्य घडविणारी ठरली. श्रीराम संगीत विद्यावलयाची मुहूर्तमेढ रोवली गेली.नाशिक सोडून पुण्यात आले ते संगीत क्‍लासचा वारसा घेऊनच.
दोन मुलींना संगीत कलेत प्रवीण केले.तबला,व्हायोलिन,सतार या वाद्यांचीही शिकवणी सुरू झाली.संसार झाला तोही या संगीत कलेच्या जोरावरच.
त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर रोटरीने त्यांना दहा हजारांचा चिराग पुरस्कार पं.जसराज यांच्या हस्ते गुरूवारी ३ एप्रिलला पुण्यात दिला.
त्यांच्या कार्याची ही ओळख......
चिराग पुरस्कार सोहळा. असा रंगला.....

Thursday, April 3, 2008

"प्रवाही"चा प्रभावी आविष्कार पुणेकरांनी अनुभवला

पुणे- प्रयोगशिल राहून नवनिर्मिती करणाऱ्या चैतन्य कुंटे,शांभवी वझे,पुष्कर लेले,चारूदत्त फडके यांनी प्रवाहीची संकल्पना मैफल गरवारे महाविद्दयालयाच्या सभागृहात नुकतीच सादर केली. भारतीय संगीत परंपरेची विविध रूपे यात दिसतात. नुकतेच या कलाकारांनी ऑस्ट्रेलिया अमि सिंगापूरचा दौरा केला. पुण्यातला हा पहिला प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला आणि दादही मिळाली. वेदकालिन सांगायनाच्या परंपरेपासून अलिकडच्या काळातील्या नाट्यसंगीत,भावसंगीतारर्यंतच्या वाटचालीचा हा नृत्य-संगीताच्या माध्यमातून रंगलेला आविष्कार.अस्वादकाला प्रवाहीच्या या संकल्पनेतून फेरी मारून आणतात ते हार्मोनियम वादक अणि संगीतकार चैतन्य कुंटे .संगीतल्या जाणकाराला अणि रसिकालाही आनंद देणारा हा कार्यक्रम. संहीताही त्यांचीच.कार्यक्रमात जिवंतपणा आणलाय तो पुण्याची कथ्थक नृत्यकलाकार शांभवी वझे आणि तरूण गायक पुष्कर लेले यांनी. सामगायन,प्रबंध,ध्रुपद.ख्याल,ठुमरी,टप्पा,तराणा आणि नाट्यसंगीतातून पुष्करने कौशल्य ओतले. नृत्त आमि नृत्यातून तालप्रस्तुती,जुगलबंदी,होरी,चतरंग,ठुमरीतून शांभवीने शैलीदार नृत्याची कमाल अदाकारी सादर करून जाणकारांच्या टाळ्यांनी दाद मिळविली. मैफलीची तबला साथ चारूदत्त फडके यांची होती तर हार्मोनियमवर स्वतः कुंटेयांनी सूरावट साकारली.
प्रवाहीचा पुढला काय्रक्रम काय नवीव देणार याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.
कार्यक्रमाचा काही भाग पाहण्यासाठी इथे क्‍लिक करावे.

Monday, March 31, 2008

कळेल हे कुणाला

आधीच व्यथीत झालेल्यांना नका करू एप्रिल फुल
त्यांच्या चिंता नाहिशा होणार काय ?
गंमत गंमत करताना मिळतो अघोरी आनंद
कुणाला किती यातना होतात
ते दिसते का कधी कुणाला?
जगण्याची स्पर्धा ठरते स्वप्नाला दूर सारते
धावताना वेग वाढवला तर नाहक बळीही पडते
क्षणिक आनंदाची भावना होते अनावर अनेकांना
ऊत्साहाच्या भरात,समुहाच्या नादात तोल जातो
मस्तीतून मादकता भिनते,दाहकता जागी होते
कळेल हे कुणाला ,विचार करणाऱ्याला
सांगाल का शेजाऱ्यांना,मित्रांना आणि भावंडाना ?