Friday, May 2, 2008

मराठी असे आमुची शिक्षणभाषा....

मराठीत शिक्षण घेऊन मानाने समाजातल्या दोन भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.अनिल अवचट आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मराठी अभ्यास मंडळात मराठी शिक्षण घेऊनही जीवनात कसे समृध्दपण आले. याची केलेली चर्चा मराठी भाषीकांना स्फूर्तीदायक ठरली.

होय ,आम्ही मराठीत शिकलो....
महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले यांच्या अनुभवातून मराठीत शिक्षण घेतल्याने आपला फायदा काय झाला ? याविषयीचे अनुभव मराठी अभ्यास मंडळात सांगीतले गेले.
त्यांच्या शब्दातच ते ऐका...

ज्ञानाची भाषा आज इंग्रजी आहे. ती यायलाच हवी. पण संस्कृतीची ओळख आणि भाषेची संपन्नता अनुभवण्याठी मराठीतूनच शिक्षण घेण्याची ठाम भुमिका मांडली. अकरावी नंतरचे तात्रिक ज्ञान मात्र परकीय भाषेत असल्याची खंत व्यक्त करून अच्युत गोडबोले यांनी संगणकाची तांत्रीक भाषा मराठीत देण्यासाठी आपण तीन पुस्तके लिहली असल्याचे सांगीतले. चवथे पुस्तक लवकरच येत असल्याची माहिती दिली. मात्र इतर लेखन मात्र मराठीतच करण्याचा आपला निर्धार पुन्हा जाहिर केला.
आजचा तरूण वर्ग पैशाच्या मागे लागला असून त्याला जगण्यासाठी अधुनिक सुविधा लागतात. मराठी मातीचा गंध तो वर्ग विसरत चालल्याची खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त झाली.
मराठी अभ्यास मंडळाच्या कार्याची माहिती करून देताना प्र.ना परांजपे यांनी मराठी शाळेतही उत्तम इंग्रजी शिकविण्यासाठी सरकारने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.. पुण्या-मंबईसह अनेक शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खेदही प्रकट केला.

Thursday, May 1, 2008

कथ्थक नृत्याला कार्पोरेट जगात स्थान देण्याचा प्रयत्न

पुण्यतल्या कथ्थक नृत्यात करियर करण्याची जिद्द बाळगणाऱ्या शर्वरी जेमीनिस यांना यंदाचा संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बीसमील्ला खॉंन यांच्या नावाने दिला जाणारा "युवा पुरस्कार" जाहिर झाला आहे. याच महिन्याच्या २९ तारखेला दिल्लीत तो समारंभपूर्वक दिला जाईल. यानिमित्ताने त्यांचेशी संवाद साधला.

त्याचा काही भाग आपण इथे व्हीडीओतून ऐकू शकता.
चित्रपटाच्या ऑफर येऊनही नृत्याला अधिक प्राधान्य देऊन त्यातच करियर करायची जिद्द बाळगून सिरियलसह चित्रपटाला नकार दिला गेला.
आजच्या कार्पोरेट जगतात कथ्थक नृत्याला वेगळे स्थान देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवे मार्ग शोधून पारंपारिक नृत्याला दर्जेदार करणे हाच शर्वरी जेमिनीस यांचा ध्यास राहणार आहे.
शास्त्रीय संगीताच्या पारंरारिक पठडीत राहूनही कथ्थकला विविध प्रकारे सादर करण्याचा ध्यास त्यांच्यात आहे.
लहानपणापासून नृत्यकलेची साधना करून आता कुठे याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्यामुळे आपल्यावर आता आधिक जबाबदारी असल्याची जाणीव त्यांच्याशी बोलण्यातून आली.
कथ्थक नृत्यासाठी महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळतोय म्हणून वेगळी जबाबदारी आपल्यावर आहे. ती प्रेरणा अपल्याला भाग्यवान ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
चित्रपटाला आवश्‍यक असणारे सारे गुण अंगी असूनही शर्वरीने सारे लक्ष्य कथ्थकवर केंद्रित करायचे ठरविले आहे.
केलेल्या भूमिकात समाधान मिळाले मात्र नृत्याचा रियाज आणि सातारा,बीडसह लावण्यांना गर्दीकरणाऱ्या रसिकांना कथ्थकमध्ये असणारी भावना पोचविणे आपल्याला अधिक प्रेरणामय वाटत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
शर्वरीच्या या पुरस्काराने पुण्याला आणि आपल्या गुरू रोहिणी भाटे यांचाही सन्मान झाला आहे.
कृष्ण-राधेच्या पारंपारिक रचनातल्या त्या भावना युनिव्हर्सल आहेत मात्र काळाप्रमाणे त्यात कांही बदल करून रसिकांना आनंद देणारी रचना गावोगावी सादर करणे याचा ध्यास मला अधिक मोलाचा वाटतो,अशी भावना शर्वरीच्या संवादातून व्यक्त झाली.

Tuesday, April 29, 2008

बासरीच्या सूरातच अमर ओक बहरत आहेत

मराठी आणि हिंदी गीतांच्या वाद्यमेळ्यात पुण्याच्या अमर ओक यांची बासरी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे टाईम्स म्युझिकने बासरीला महत्व असलेल्या गीतांची सीडी बाजारात आणली आहे. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात डॉ.सलील कुलकर्णी,आनंद मोडक या दोन संगीतकारांच्या उपस्थितीत सीडी रसिकांसमोर उलघडली. त्यानिमित्त सादर झालेल्या "अमर बन्सी" कार्यक्रमातून त्यांच्या बासरीच्या सूरावटीने वाहवा मिळवीली. बासरीचा नाद आणि त्याच्या सूरांनी अमरच्या वादनकौशल्याचे दृष्य परिणाम दाखविले.
बासरीचा सूर आता कुठे घुमू लागला... पहिला भाग
झीच्या सारेगमतल्या बऱ्याच गाण्यातून अमर ओकांच्या बासरीच्या सूराची फुंकर न ऐकली नाही असा प्रेक्षक असणे महाकठीण.
अमर ओकांचा प्रवास असा झाला... भाग दुसरा
वडी लांच्या सोबत बासरीच्या क्‍लासला जाणारा अमर बालपणीच बासरीच्या प्रेमात पडला. कालांतरांने वडीलांनी क्‍लासला रामराम ठोकला. पण अमरने मात्र बासरीची तालीम कायम ठेवली.
घरची परिस्थिती बेताची. तरीही आई-वडीलांनी अमरची बासरीवादनाची कला जपली-वाढविली. कॉलेज,पुढे एमसीएससाठीही अमरने अभ्यास केला. पण एकाच ठिकाणी आठ-आठ तास बसून रोज तेच ते काम करायचे या नोकरीच्या चौकटीत रहाणे त्याला पसंत नव्हते. नियतीने त्याची गाठ घालून दिली ती अशोक हांडेंशी. त्याच्या कार्यक्रमात बासरीची साथ करताना दुबई,सिंगापूरचा दौरा मिळाला. पैसा मिळाला.कला सहवास लाभला.
आणखी एक बांलावणे आले ते किशोरजी व्यास यांच्या कार्यक्रमात भजनाला बासरीची साथ करण्याची. कृष्ण-राधेच्या गोकुळात रंगणारा आणि बासरीच्या मोहक सूरावर गोपींसह गायींनाही नादावणारा हा बासरीचा सूर तिथेही रंगला. भक्तीची ही नवी प्रेरणा बासरीतून आळविण्याचे भाग्य लाभले.
शिवरंजनीच्या "सूर-ताला"ची नवी दिशा पकडली. अमरचे बासरीचे कौशल्य इथेही बहरले. कार्यक्रमांची साथ करताना हृदयनाथ मंगेशकेर,अनुराधा पौडवाल,सुरेश वाडकर,सुधीर फडके,उषा मंगेशकरांच्या सभोवताली बासरीचे सूर घुमू लागले. संगीतकारांचा लाडका बासरीवादक म्हणूव रेकॉर्डींगलाही बोलावणी आली. झीच्या "सारेगम"तर अमरचे नाव आजही गाजत आहे.
साथीचे वाद्य म्हणून असलेल्या बासरीच्या कार्यक्रमाने मनाने तो रमला मुंबईत मुक्कामही ठोकला. मुंबईत स्टुडिओतील उठबस वाढली. पण कलेचा साधक म्हणून ते अतृप्तच राहिले.
बासरीला महत्व असणाऱ्या गीतांची निवड केली.. नव्या फ्यूजनची रचना केली. आणि टाईम्स म्यूझिकने त्यांची साडी बाजारात आली.
साथ करता करता स्वतःच्या वादनाकडे अधिक लक्ष देऊन यातूनच नवनिर्मिती करावी अशीच यापुढची अमर ओक यांची वाटचाल असेल