Saturday, May 17, 2008

संगीतकार बाळासाहेब माटे यांच्या स्मृतींना उजाळा

प्रसिध्द गायिका माणिक वर्मा यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्ताने संगीतकार बाळासाहेव ंमाटे यांच्या स्वररचनांवरील आधारित विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या कार्यक्रमाची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा,

पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात नरेंद्र भिडे यांच्या संगीत नियोजनाखाली भक्तिगीत ,सुगम संगीत, नाट्यसंगीत या तिन्ही दालनातले माटे यांचे वैशिष्ट्य सांगणारी गीते सादर झाली.

त्यांच्या शिष्यवर्गात अनुराधा मराठे, शैला दातार यांच्यासह मानसी खांडेकर, शिल्पा पुणतांबेकर, सावनी कुलकर्णी, चित्रा आपटे, राजेश्वरी वैद्य, आर्या आंबेकर, मालती बापट यांनी रसिकांना आनंद दिला.
अरूण नुलकरांच्या निवेदनात माटे यांची कारकिर्द पुन्हा उजळून निघाली.

Friday, May 16, 2008

मोठी स्वप्ने बघीतली तरच काहितरी चिमटीत येते....केदार शिंदे

राज ठाकरे चांगले चित्रपट दाखवितात. चांगले संगीत ऐकवतात. चांगली पुस्तके वाचायला देतात. त्यांच्या कडून जे करशिल त्याचा भव्यतेने विचार कर. मोठी स्वप्ने पहायला त्यांनी शिकविले. योग्य वेळ येताच आपण राजकारणात येणार असल्याचे सूतोवाचही केदारने बोलता बोलता केले.
सध्या मी काही काळ थांबलोय. पहातोय. बघतोय. विचार करतोय. थोडी विश्रांती घेतोय.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
केदार शिंदे डीएसके गप्पात बोलत होते. दिलखुलास.राजेश दामले यांनी घेतलेल्या मुलाखतीतून गंगाधर टिपरे ही मालिका आणि सही रे सही वर बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. सुनिल बर्वे,ऋजुता देशमुख आणि निलम शिर्के यांच्याशी गप्पांचे आयोजन केले होते. पण केदार शिंदे यांच्या मुलाखतीचा प्रभावामुळे इतर कलावंत इथे पुरेसे बोलके होऊ शकले नाहीत.
"अंकुश चौधरी साडे माडे तीन म्हणून दिग्दर्शक बनून आपल्याच पोटावर पाय आणतोय हा विनोदी संवादही केदार यांनी ऐकविला. अंकुशला चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टी शिकायची इच्छा होती. तो "अग बाई ..अरेच्चा"चा सहाय्य्‌क दिग्दर्शकही होता. भरत जाधव दिलेले काम चोख पार पाडणार." केदार मैत्रीचे दिवस आठवताना आजही रोमांचित होतो. सध्या हे त्रिदेव एकमेकांना भेटणेही कठीण झालेय,असा शेराही केदारने मारलाय.
सही रे सही'ने १९००प्रयोगांचा टप्पा गाठलाय. ट्रिक्‍स ट्रिटमेट देऊन नाटकात प्रेक्षकांना गुंतविण्याची ताकद आहे. मी नाटकाची आई असलो तर भरत जाधव बाप आहे. हे मुल आमच्या दोघांचे आहे. लेखक म्हणून नाटक ग्रेट नाही. हे नाटक हा प्रेक्षकाला चकवा देण्याचा भाग आहे. रिमोटच्या तडाख्यात अडकलेल्या मराठी प्रेक्षकांना रंगमंचाकडे आणण्यात मी यशस्वी ठरलोय. याचे श्रेय नक्कीच केदारला जाते.
आज मागे वळून पाहताना मराठी मातीतले शाहिर साबळेंचे संस्कार घेऊन वेगळे देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तीन चित्रपटानंतर नव्या ऑफर्स येताहेत. चांगलं करायची इच्छा आहे. मात्र बजेट निर्माते वाढवत नाहीत. भव्य स्वप्न सत्त्यात आणण्याची मनिषा नक्की आहे. गंगाधर टिपरेने कुठे थांबायचे ते शिकविले.
आत्ता केदार फक्त पहातोय. पण फिनिक्‍स पक्षाप्रमाणे त्याने घेतलेली नवी भरारी तुम्हाला नक्की दिसेल. असा तुम्हा-आम्हाला विश्वास आहे. आपणही इथच थांबूया !.

Thursday, May 15, 2008

जुन्या संगीत नाटकांना वासंतिक महोत्सवात उजाळा

जुन्या संगीत नाटकांचे जतन करण्याच्या उद्देशाने भरत नाट्य मंदिर मे महिन्यात वासंतिक संगीत महोत्सव साजरा करते. गेली १८ वर्षे सातत्याने तो प्रेक्षकाभिमुख होतो आहे. सोहळ्याची सुरवातीचा दिवस असा साजरा झाला.त्याची ही ध्वनीचित्रफित..
संस्थेची शारदा,संशयकल्लोळ,मानापमान आणि कट्यार काळजात घुसली ही नाटके तर पुण्याबाहेरचे कलापिनी ,तळेगावचे संगीत चैती अशा पाच नाटकांना महोत्सवात रसिकांना पाहायला मिळाली.
भरत नाट्य संशोधन मंदिराच्या महोत्वसाच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे आणि नाटकाचे हे चित्रीकरण
संगीत शारदाच्या वेळी ५५ वर्षापूर्वी काम केलेल्या कलावंताचा सत्कार करून त्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
सवाई गंधर्व महोत्सवाइतके या वासंतिक संगीत महोत्सवाला सातत्याने यश मिळत असून पुण्याबाहेरची रसिक मंडळी दरवर्षी या महोत्सवाला आवर्जून येतात असे निरिक्षण संस्थेचे दिग्दर्शक रविंद्र खरे यांनी व्यक्त केले.

नवी पिढी या पारंपारिक नाटकाकडे दुर्लक्ष करित असली तरी ती नाटके पाहणारा एक वर्ग आहे. त्यांना या नाटकाची मोहिनी आजही पडत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसत आहे.

Wednesday, May 14, 2008

आणि वासुदेव बळवंत फडके काढला.....

माझ्या मुलाने माझे व्यक्तिमत्व आणि आईचे सीमाचा आभिनय उचलला आहे.
अमेरिकेत चाललेल्या वासुदेव बळवंत फडके सीनेमाची कल्पना कशी सुचली ?
डीएसके गप्पांमध्ये या आणि अशा प्रश्रांची गप्पात मिळालेली उत्तरे
दिलखुलासपणे दिलीत रमेश देव यांनी...

सुधीर गाडगीळ यांनी रमेश देव यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा..

Tuesday, May 13, 2008

सुरेश वाडकरांची रंगलेली मैफल

सकाळ रसिक परिवाराच्या पहिल्या कार्यक्रमाची सुरवात प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या गायनाने झाली.
त्यांनी केलेल्या "स्वरविहारा"त रसिक गुंगुन गेला होता.

सुरेश वाडकरांच्या गायनातला हा कांही अंश.........