Saturday, May 24, 2008

नरेंद्र टोळे यांचा नाणे खजिना पुणेकरांसाठी रिता

चाळीस वर्षांपासून छंद म्हणून गोळा केलेली विविध नाणी, नोटा पुण्याच्या कर्वेनगर भागातल्या नटराज सभागृहात पाहण्यासाठी गर्दी केली जात आहे. लहानपणी भावाने दिलेल्या एका दुर्मीळ नाण्याची भुरळ पडून हा छंद नरेंद्र टोळे यांना जडला . भारतातली १९६४ पासूनची सर्व नाणी त्यांच्या संग्रहात पाहता येतात.

त्या नाण्यांची ओळख पटवणारी ध्वनीचित्रफित पहाण्यासाठी इथे क्‍लिक करा.

भारताबाहेरच्या १७४ देशातल्या चलनी नोटा, कांही नाण्यांचे नमुने त्यांच्या या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची अणि या घटनेला पन्नास वर्ष झाल्याची तारीख असलेल्या पन्नास रूपायांच्या नोटेसह अनेक फॅन्सी नोटा प्रदर्शनात आहेत.
वेगवेगळ्या देशांची ओळख, धर्म, झेंडा अणि लोकसंख्येची माहिती असलेल्या नोटा आकर्षण ठरतात.
स्वामी विवेकानंदापासून अनेक भारतातल्या लोकप्रिय व्यक्तिंच्या जन्मतारखांच्या नोटांचे कलेक्‍शन सध्या ते जमवताहेत.
आत्तापर्यंत २२०० नोटा जमा झाल्यात. कांही काळानंतर तोही नव्या प्रदर्शनाचा विषय असेल असे नरेंद्र टोळे यांच्याशी बोलताना समजले

Wednesday, May 21, 2008

नाटक ही गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे-डॉ.लागू

केवळ करमणूक हा नाटकाचा उद्देश नाही. ती एक गंभीर बाब आहे. माणसातल्या सुप्त संवेदनांना जाग आणणारी ही कला आहे. थिल्लरपणे करण्याची ही गोष्ट नाही. कालिदासाने म्हटल्याप्रमाणे शब्द आणि स्वरांनी करायचा तो यज्ञ आहे. आज तेवढ्या गांर्भीयाने या कलेकडे पाहिले जात नाही . अशी विविध मते डॉ. श्रीराम लागू यांनी सकाळ ने प्रकाशित केलेल्या नाट्यरंग आणि स्वरविहार या दोन त्रैमासिकाचे प्रकाशन करताना काढले. आपण आज शारीरीक दृष्टया नाटक करू शकत नसलो तरी नाटक हा आपल्या जिवनाचा आमिभाज्य भाग आसल्याचे सांगत " मी नाटके पहातो. त्याविषयीच्या चर्चा करतो. कलावंताशी-दिग्दर्शकांशी बोलतो रंगभूमीवर काय चालले आहे याची मला जाणीव आहे." असे डॉ. सांगतात.


हे संपूर्ण भाषणच तुम्ही इथे पाहू-ऐकू शकता.

Sunday, May 18, 2008

फिरोज दस्तूर कलाकार म्हणून श्रेष्ठच पण माणूसही......

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि एके काळचे चित्रपट कलावंत पं.फिरोज दस्तूर यांना श्रध्दांजली वाहताना त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या मोठेपणाच्या आठवणी सांगण्यात आल्या. पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून त्यांचे मोठेपण प्रत्येकाच्या बोलण्यातून प्रकट होत होते.

कार्यक्रमाची व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात त्यांच्या स्मृतीला आभिवादन केले गेले. त्यांचे पुतणे रूस्तुम दस्तूर हे अमेरिकेतून या कार्यक्रमाला हजर होते.त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पं.भिमसेन जोशी तब्येत बरी नसल्याने हजर राहू शकले नाहीत. पण त्यांचे सुपूत्र श्रीनिवास जोशी यांनी शव्दात अणि गायनाद्वारे किराणा घराण्याच्या श्रेष्ठ गायकाला विनम्रपणे आदरांजली वाहिली.
त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी आणि श्रीकांत देशपांडे यांनी स्वराने त्यांच्या गायनकलेला अभिवादन केले.
त्यांच्या नावे मुंबई विद्यापिठात स्वतंत्र चेअर निर्माण करून त्यांची स्मृती कायम रहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ज्येंष्ठ पत्रकार आणि संगीताचे जाणकार रामभाऊ जोशी यांनी केले, उस्मान खान, डॉ.सतीश कौशिक, नाथ नेरळकर, सत्यशिल देशपांडे यांनी आपल्या भाषणात दस्तुरांच्या आठवणीतून आणि गुरू म्हणून केलेल्या कार्याची महती वर्णन केली