Friday, May 30, 2008

लोकनृत्यांच्या शोभायात्रेने पुणेकर भारावले

अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अकरा दिवसांच्या महोत्सवाचे देखणे रूप आज पुणेकरांना अनुभवता आले. पंधरा राज्यांतील पथके आज मोठ्या मिरवणुकीने टिळक स्मारक मंदिरापासून निघून गणेश कला-क्रीडा केंद्रात दाखल झाली.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

विविध भाषांचे सुमारे सहाशे कलावंत वाजतगाजत टिळक रस्त्यावरून निघाले ते पाहणेही नयनरम्य होते. पुणेकरांची वाहनेही मग काही काळ थांबली.

झारखंड, आसाम, गुजरात, छत्तीसगड, चेन्नई, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, ओरिसा आणि महाराष्ट्रातले क लावंत आपल्या पारंपरिक वेशभूषेत नाचत-गात पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते.

गेले काही दिवस पुण्यात विविध राज्यांच्या १५०० संघाचे ४५०० कलावंत बालगंधर्व रंगमंदिर, केसरी वाडा, टिळक स्मारक मंदिर आणि गणेश कला-क्रीडा केंद्रात भारतीय पारंपरिक संगीताची, नृत्याची आणि नाटकांची झलक दाखवत आहेत.
आज भव्य मिरवणुकीने गेलेल्या संघांनी गणेश कला-क्रीडा केंद्रात आपापल्या राज्यातल्या लोकसंगीताची झलक दाखविली.

Thursday, May 29, 2008

सरकारी मदतीशिवाय उभे आहे "आपलं घर'

समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना आणि निराधार गरजू मुलांना एकत्रित छत्र देणाऱ्या "आपलं घर'च्या डोणजे येथील नवीन पुनर्वसन प्रकल्पाचे नुकतेच उद्‌घाटन झाले.३० मुले आणि १० वृद्धांना आधार देणाऱ्या या प्रकल्पाचे उद्‌घाटन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले.

या प्रकल्पाची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील गोळेवाडीतल्या ४४ गुंठ्यांत हा पसारा उभा राहिला आहे तो स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फौंडेशनचे संचालक विजय फळणीकर यांच्या मार्गदर्शनातून. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय समाजातल्या देणगीदारांच्या भक्कम पायावर ही वास्तू उभी राहिली आहे. वारजे परिसरात मुलांचे "आपलं घर' यापूर्वीच सुरू झाले आहे. आता हा या फौंडेशनचा दुसरा प्रकल्प. येथे पैसे असूनही निराधार असलेल्या वृद्धांसाठी स्वतंत्र अशा छोट्या खोल्या उभ्या केल्या गेल्या आहेत. त्या देणगीदारांच्या मदतीवर साकारण्यात आल्या आहेत. आम्हाला समाजासाठी काही करायचे आहे, पण निःस्वार्थीपणाने काम करणाऱ्या संस्था आज नाहीत, असा शेरा मारून काही देणगीदारांनी फळणीकरांच्या या कार्याला मदतीचा हात दिल्याची भावना व्यक्त केली.
निराधार वृद्धांना केवळ पाचशे, तर आधार हवा असलेल्यांकडून तीन हजार रुपये घेऊन त्यांची येथे सोय केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव शरद फडणीस यांनी दिली. समाजात आज आशा वृद्धाश्रमांची गरज वाढत असल्याचे विजय फळणीकर सांगतात.

Monday, May 26, 2008

दशरथ पुजारी यांच्या स्मरणार्थ पुण्यात स्वरांजली अर्पण

ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांचे स्मरण त्यांना स्वरांजली वाहून पुण्यात केले गेले.

"स्वरानंद'ने ही स्मरणांजली आयोजित केली होती.

कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
त्यांचे सुपुत्र उदय पुजारी यांनी वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या आणि गाणी सादर केली.

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी दशरथ पुजारी यांच्या साधेपणाची काही उदाहरणे दिली.

अपर्णा संत, मधुरा दातार, प्रमोद रानडे यांनी दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना सादर केल्या.
कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातल्या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांची
आणि संगीत रसिकांची खास करून उपस्थिती होती.

Sunday, May 25, 2008

गोजिरवाण्या घरात'"आनंद अभ्यंकर हरपला

ज्या गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आनंद अभ्यंकर याने पुण्यात रंगमंचावर पहिले पाऊल पडले, त्याच सभागृहाचे रूपांतर या प्रवासामुळे "गोजिरवाण्या घरात' झाले होते.

आनंद अभ्यंकर यांच्या कला कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून "मित्रमंडळीं'तर्फे "आनंदरंग' हा कौतुक सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता.

कौतुकाने आनंद हरखून तर गेलाच पण पुणेकरांच्या स्मरणात राहिलेली ही संध्याकाळ होती. समीरण वाळवेकर यांनी त्याची मुलाखत घेतली. झी मराठीच्या नितीन वैद्य यांच्या हस्ते आनंद अभ्यंकरांचा सत्कार केला गेला.

त्या सोहळ्यची ध्वनिचित्रफित इथे पाहता येईल..