Saturday, July 12, 2008

ओढ पावसाची

ओढलेल्या पावसाला हाक देती येथले
पेरलेल्या त्या बीजाला कोंब येतील का बरे

ओढ आहे धरतीला सरींच्या त्या बरसण्याची
धाव घे विठू आता दे मृगांची सरींची

माजलेल्या गवतास आला रंग आता करडा
चातक आहे धरणी आज सरत आला केवडा

ऋुतू आहे पावसाचा मात्र वाट पाहवी लागते
वर्तमानालाही आता भविष्याचे गूढ आठवावे लागते

सुभाष इनामदार

समाज म्हणून विकासच नाही- द. मा. मिरासदार

ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणाऱ्या "मृण्मयी पुरस्कार' ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांना द.मा. मिरासदार यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यात देण्यात आला. सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा "नीरा गोपाल पुरस्कार' धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील "बारीपाडा' या आदिवासी गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा डोळस प्रयत्न करणाऱ्या चैतराम पवार देण्यात आला.

Friday, July 11, 2008

नव्या पिढीची आवड पाहून संगीत नाटके करा

""संगीत नाटकांची परंपरा कायम राखण्यासाठी नव्या पिढीची आवड लक्षात घेऊन ही नाटके नव्या स्वरुपात सादर करावीत,'' अशी सूचना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा (कै.) कृष्णराव गोखले पुरस्कार ज्येष्ठ गायक आणि अभिनेते अरविंद पिळगावकर यांना प्रदान करताना केली. याच कार्यक्रमात अभय जबडे, विश्वास पांगारकर, श्‍याम शिंदे आणि नेहा बेडेकर या रंगभूमीशी संबंधित असलेल्या व्यक्तींना (कै.) नरहरबुवा पाटणकर आणि हरी गणेश फडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अचानक ओळी खांद्यावर उतरतात पक्षी उतरावा अशा !

"जे मनातल असत ते अरूप असते. त्याची स्पष्ट कल्पना स्वतःलाही नसते. त्याची बाहेर येण्याची धडपड आणि हालचाल मात्र आतल्या आत सुरूच असते. रूप आणि अरूप या दोन्हीची जेव्हा गाठ पडते, तेव्हा कविता जन्माला येते. कधी कुठला प्रसंग असेल , घटना असेल. कधी काहीच नसेल. पण अचानक ओळी खांद्यावर उतरतात पक्षी उतरावा तशा !'-कवी सुधीर मोघे सांगतात.

Monday, July 7, 2008

रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा - सुधीर मोघे

"गो नी दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार मी घेतोय. एक अत्यंत मराठी साहित्यातला महत्वाचा मानदंड म्हणावा अशी व्यक्ति. यापलिकडे एक व्यक्तिगत अनुबंध या दोनही अंगाने या पुरस्काराची मला अपूर्वाई नक्कीच आहे, असे मृण्ययी पुरस्कार जाहिर झाल्यानंतर कवी, गीतकार, संगीतकार आणि याशिवाय नव्याने ओळख व्हावी असे चित्रकार सुधीर मोघे यांनी आपल्या भावना ई-सकाळसाठी विशेष मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली. गेली दोन-अडीच दशके कलेच्या प्रांतात आपले नाव झळकविणाऱ्या या कलावंतांची ई-सकाळच्या सुभाष इनामदारांनी मुलाखत घेतली . गेली दोन तीन वर्षे हा मनस्वी कलावंत चित्रकाराच्या रूपात स्वतःला व्यक्त करतोय. या आपल्या रूपाची ओळख बाहेर फारशी आलेली नाही असे सांगत याप्रवासाची सुरवात मोघे स्वतःच सांगताना म्हणतात," लहानपणापासून आपल्याला इतर कलांबरोबर चित्रकलेची गोडी होती. काव्य, संगीत, गीते, मीडीयातली वेंगवेगळी आव्हाने स्वीकारत होतो. पण कांही दिवसात त्यातही साचेबध्दपणा आल्यासारखे जाणवत होते. माझ्या कवीतेत , शापीत मधल्या "दिस येतील, दिस जातील' अशा गीतातही चित्रालाच आपण शब्दात साठवत होतो. दोन वर्षोपूर्वी ठरवले. मनाशी नक्की केले. चित्रे रेखाटायची. गेलो बाजारात. चित्राचा बोर्ड, कागद आणि रंगांचे साहित्य आणले आणि माझ्यातल्या चित्रकाराच्या रूपाचा मलाच साक्षात्कार झाला.' आपल्या कलाप्रवासाचा पटच त्यांनी या मुलाखती दरम्यान उलघडून दाखविला. "जे जे अत्तापर्यंत मी करायची धडपड केली ता कुठलीही माझा अधिकार नसताना केली नाही. मला नेहमी नवे अंगण नवे आकाश शोधायल्या शिवाय बरे वाटत नाही.' चित्राच्या प्रातांत चाललेल्या धडपडीची पार्श्‍वभूमीच ते यातून व्यक्त करत होते. सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाची ओळख मराठी माणसाला पुन्हा एकदा व्हावी. आणि त्यांच्या काही कवीता ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यासाठी त्यांना सोमवार ७ जुलैपासून कांही दिवस www.esakal.com या साईटवर यावे लागेल.

Sunday, July 6, 2008

व्हायोलिन वादकांनी केले रसिकजन घायाळ

आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिन आणि संजीवनी आगाशे यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यातल्या चार व्हायोलिन वादकांनी एकत्र येऊन व्हायोलिन वादनाचा "रसिकप्रिया व्हिओलिना, स्वरांजली' हा आगळा कार्यक्रम सादर करून वाद्यवादनात नवा पायंडा पाडला अभय आगाशे, चारुशीला गोसावी, नीलिमा राडकर, संजय चांदेकर या चौघांनी आपल्या वाद्यवादनातले कौशल्य तर दाखविलेच, पण व्हायोलिन बोलते असे म्हणतात त्याचा प्रत्यय आणून दिला. शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित सुगम संगीत आणि चित्रपटगीतांच्या सुरावटीने रसिकांना आनंद दिला. रचनांतील विविधता आणि वादनातील कौशल्य यामुळे असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी रसिकांची मागणी आहे. मनोज चांदेकर, अविनाश तिकोनकर, विनित तिकोनकर, अनय गाडगीळ, माधवी दिवेकर, भूषण जुंदरे आणि सुधीर देशपांडे यांच्या साथीने कार्यक्रमाने उंची गाठली. निवेदनातील विविधता वैशाली जुंदरे यांनी जपली

पावसाचे "गूज 'अनुभवले गीतातून

झी सारेगमपच्या चार कलावंतांनी रविवारी पावसाच्या गीतांचा कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात सादर करून आपल्यातल्या गुणांचे दर्शन घडविले. स्वर संवेदना प्रस्तूतच्या "गूज पावसाचे' यातले गायक कलावंत होते गौतम मुर्डेश्वर, श्रीकांत कुलकर्णी, वीणा जोगळेकर अणि मृदुला मोघे. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केलेल्या कार्यक्रमातले निवेदक संजय दामले यांनी गीतांना उठावदार बनवतील अशा वाक्‍यांचा आधार घेऊन रसिकांना गुंतून ठेवले. पुण्यातल्या चोंखंदळ रसिकांना आवडेल असाच "गूज पावसाचे' हा कार्यक्रम होता. वादक अणि गायकांनी एकत्रितपणे दिलेला स्वरांचा अनुभव काही काळ लक्षात ठेवण्यसारखाच होता.

व्हायोलिन वादकांनी केले रसिकजन घायाळ

आंतरराष्ट्रीय व्हायोलिन दिन आणि संजीवनी आगाशे यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यातल्या चार व्हायोलिन वादकांनी एकत्र येऊन व्हायोलिन वादनाचा "रसिकप्रिया व्हिओलिना, स्वरांजली' हा आगळा कार्यक्रम सादर करून वाद्यवादनात नवा पायंडा पाडला.

कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

अभय आगाशे, चारुशीला गोसावी, नीलिमा राडकर, संजय चांदेकर या चौघांनी आपल्या वाद्यवादनातले कौशल्य तर दाखविलेच, पण व्हायोलिन बोलते असे म्हणतात त्याचा प्रत्यय आणून दिला.

शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित सुगम संगीत आणि चित्रपटगीतांच्या सुरावटीने रसिकांना आनंद दिला. रचनांतील विविधता आणि वादनातील कौशल्य यामुळे असे कार्यक्रम वारंवार व्हावेत, अशी रसिकांची मागणी आहे.

मनोज चांदेकर, अविनाश तिकोनकर, विनित तिकोनकर, अनय गाडगीळ, माधवी दिवेकर, भूषण जुंदरे आणि सुधीर देशपांडे यांच्या साथीने कार्यक्रमाने उंची गाठली.

निवेदनातील विविधता वैशाली जुंदरे यांनी