Friday, July 25, 2008

सतत प्रयोग करणे हाच आनंद मोडक यांचा स्थायीभाव

अकोला गावात शिक्षण घेताना माधुकरीसारखे संगीतातले विविध विश्व आनंद मोडक टिपत गेले. आजही तीच वृत्ती जपत ते नवे, वेगळे आणि स्वतःची ओळख निर्माण करीत काळाच्या पुढे वाटतील अशा चाली देत आहेत. त्यांचा हा सांगितिक प्रवास शुक्रवारी गानवर्धनच्या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवला.
दहा नाटके. ३६ चित्रपट. ७ हिंदी आणि ८ मराठी सिरीयलला संगीत देवून अनेक पुरस्काराने आनंद मोडक हे नाव लोकांसमोर आले. पारंपारिकतेला छेद देत त्यांच्या संगीताने नवे मार्ग चोखाळले.
संगीताच्या ध्यासाने पुण्यात स्थिरावले. सुर - तालाचा नाद जिथे मिळेल तिथून घेतला. घाशिराम कोतवाल या पीडीएतल्या नाटकाच्या दरम्यान संगीताच्या वातावरणात मोडक पुण्यात आले.
सतिश आळेकरांच्या महानिर्वाण या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. आकाशवाणी. दूरदर्शन. पुढे चित्रपटातून प्रवासाला निघालेला हा संगीतकार महाराष्ट्र बॅंकेची ३६ वर्ष करून संगीतकाराचा प्रवास आजही जपत तो आधिकाधिक समृध्द करत आहे.
तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी यात वेगळेपण आहे. त्यातही शब्दाला प्राधान्य देताना केलेला हा वेगळा प्रयोग मोडकांच्या कारकिर्दीतले वेगळेपण स्पष्ट करीत होते.
कुमार गंधर्वांच्या गायकीचा आपल्यावर प्रभाव आहे.हे ते मान्य करतात.
ते दैवतच आपण ंमानतो. हे सांगताना त्यांचे गाणे ,त्याचे विचार,
अपल्याला नेहमी बोट धरून नेत असतात असे वाटते.
काळाच्या पुढचे संगीत देणार संगीतकार म्हणून मराठीत आनंद मोडक हे नाव सुपरिचित आहेत.त्यांच्या सांगेतिक प्रवासाचा अनुभव घेताना त्यांच्या विविध रचनाही इथे एकायला मिळाल्या.