Saturday, October 4, 2008

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा

किती वेचू, किती आठवू

क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....


हिच कविता प्रत्यक्षात ऐका आणि पहा...

Wednesday, October 1, 2008

क्षणांचा पडला सडा

आठवणींच्या कुपीत पारिजातकाचा सडा
किती वेचू, किती आठवू
क्षण माझा मोहरुन विसरलो मी मला....

ओंजळीत वेचलेली फुले मनात दरवळतात
किती घेऊ, किती टिपू
क्षणांचा सहवास सादही मला घालतात....

न्हालेल्या केसांतून गळतात टपटप मोहरा
किती झेलू, किती सोडू
क्षणात दिसतात, पाहतात तो चेहरा....

स्पर्शाचा बहर नटलेला, स्वर्ग हलताना दिसतो
किती ओंजळी, किती वेळा
क्षणांची निसटतात पिसे, मोहवतात, भिरभिरतात....

वर्षांची उलटतात पाने, विरतात कागद
किती शोधू, किती साठवू
क्षणांच्या त्या भाग्याने, ओंजळीतल्या कशिद्याने....

क्षणांचा हिशेब क्षणातच उलगडतो
किती मोजू, किती नाचवू
क्षण मात्र वेढतात पुढच्या क्षणांचा तिढा...

सडा पारिजातकाचा आहे क्षणभंगुर
किती भरू, किती निवडू
क्षणांवर कोरलाय क्षणांमधला भावांकुर.....

कधी विसरू म्हणता विसरता येत नाही
किती देऊ, किती घेऊ
क्षणांचेही त्या सांगता येत नाही....

बेईमान न होता, सोबत करीन तुला
किती शपथा, किती सांगता
क्षणाला झेलण्यासाठी क्षणांचा करीन झुला...

सारे जीवन म्हणजे पारिजातकाचा सडा
किती साठवू, किती निवडू
क्षणांच्या साक्षीने क्षणांवरच झालो मी फिदा.....

सुभाष इनामदार,
पुणे.
३० सप्टेंबर २००८

उदे ग अंबे उदे- जागर देवीचा

देवीच्या नवरात्रीचा उत्सव मंगळवारपासून देशभरात सुरु झालाय.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
घरोघरी घटस्थपना करुन देवीचा जागर केला जातो.
देवीच्या नावाने घातलेला गोंधळ हा याच उत्सवाचा एक भाग समजला जातो.

गोंधळांचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करावे.

Tuesday, September 30, 2008

दीदी आणि मी- आठवणींचा कप्पा
मंगेशकर कुटुंबाला "सोनियाचा दिनू' दाखवणारी आमची लतादीदी म्हणजे


मास्टर दीनानाथांचा पुनर्जन्मच...


हृदयनाथांच्या दाटलेल्या कंठातून अशा एक एक आठवणी उलगडत गेल्या


अन्‌ त्या ऐकताना श्रोत्यांनीही पाणावलेल्या डोळ्यांत ते "सोनियाचे' क्षण साठवले.


निमित्त होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ८० व्या वाढदिवसाचे!


"स्वरभारती'तर्फे आयोजित "दीदी आणि मी' या कार्यक्रमात


ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या आणि लतादीदींच्या


आठवणींचा कप्पा पुणेकरांसमोर उघडला .


या क्षणांचे साक्षिदार होण्यासाठी तुम्हीही हा व्हिडीओ पहा.
......आणि रविवारी सायंकाळ दणाणून गेली
बीएमसीसी महाविद्यालयाने सादर केलेल्या "दोन शूर' या एकांकिकेत ओम भूतकर आणि अभय महाजन.------------------------------------------------------------------------------------
""पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक फेरीत केलेला संघर्ष


आणि त्याचा अनुभव ही आयुष्यभराची शिदोरी आहे.


नव्या पिढीला रंगभूमीवर कार्य करण्यास "महाराष्ट्रीय कलोपासक'ने


नेहमीच प्रोत्साहित केले आहे.


या स्पर्धेतील प्रत्येक कलाकाराच्या मनात "पुरुषोत्तमचे दिवस'


निरंतर घर करून राहतात. हेच या स्पर्धेचे यश आणि


स्पर्धेने दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे.''


इति अरुण काकडे.


या स्पर्धेतले यशस्वी संघांना अणि महाविद्यालयांना


अरुण काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


अतिशय तरिणाईने बहरलेल्या वातावरणात हा समारंभ रविवारी साजरा झाला.

फिल्म्स डिव्हीजनकडे अद्ययावत ग्रंथालय

एके काळी चित्रपटगृहात दाखविला जाणारा फिल्म्स डिव्हिडनचा माहितीपट
आता कालबाह्य झाला आहे.
मात्र या सरकारी विभागाचे काम वेगळ्या पध्दतीने सुरू आहे.
नेमके काय काम चालते याविषयीचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

देशातल्या मान्यवरांच्या जीवनावर आधारीत चित्रफिती ते तयार करत आहेत.
त्यापैकी एक होती संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्यावर
नुकतीच पुण्यात दाखविण्यात आलेली फिल्म.
फिल्म्स डिव्हीजनकडे भारतीय कला आणि संस्कृती
विषयक दहा हजारांवर चित्रफिती उपलब्ध आहेत.
त्यांचे अद्ययावत डिजीटल ग्रंथालय मुंबईत आहे.
त्या कुणालाही आभ्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती
फिल्म्स डिव्हिजनचे कार्यकारी निर्माते कुलदिप सिन्हा
पुण्यात बोलताना दिली.

मराठी रंगभूमिवरचे एक कालपर्व संपले


ज्येष्ठ दिग्दर्शक आणि कलावंत दामू केंकरे यांचे

रविवारी मुंबईत निधन झाले.

त्यांना आविष्कार, मुंबईचे अरुण काकडे

आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ.वि. भा. देशपांडे

यांनी वाहिलेली श्रध्दांजली .


डॉ. नारळीकरांनी दिला मेहनतीचा गुरुमंत्र


महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते

शनिवारी डॉ. गो. रा. परांजपे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

""मेहनतीच्या यशाने मिळणाऱ्या आनंदाची मजा चाखायला शिका,''

असा गुरुमंत्रही डॉ.नारळीकरांनी यांनी दिला.