Tuesday, March 9, 2010

पहाट झाली


वयाची संध्याकाळ होताना
`सकाळ`ची साथ मिळताना

नवे धेय्य दिसत होते

संधीचे नवे दार उघडत होते


तंत्राशी नाते नवे होते

आता ते बातमीतून बोलत होते

बातमी सांगत होती मला कुठे बसवा

लेखही बोलताना सदर खुणावत होता

वर्तमानाला अधिक गतिमान करणारे

नवे माध्यम हाताळताना धीर अधीरता

तंत्राच्या कोंदणात बसवण्याची कारागिरी

दिसायला सोपी तरीही नवे प्रश्न

छापलेल्या शब्दांना इंटरनेटच्या

जगात जायचे होते

अंतरावर असलेल्या मराठी मनात

ते रुजवायचे होते


दिशा दिसू लागली

रिकाम्या जागा भरु लागल्या

तंत्रातून भाषा उमटायला लागली

संगणकावरची कळ शब्दांना आकारु लागल॓


नवी पहाट नवे तंत्र

छाप्यावाचून बातमी उमटायला लागली

फेर धरुन अंक हलू लागला

किलोमिटरची सीमा सोडून

परदेशात वाचता यायला लागल॓

विश्वची माझे घर

शब्दातून खरे झाले

२६ जानेवारी २०००

`सकाळ`चे दालन जगावर दाखल झाले

आनंदाचा वेलू गेला विश्वावरी

शांती मनाची आता झाली खरी


सुभाष इनामदार

email- subhashinamdar@gmail.com (mob. )9552596276

No comments: