Thursday, March 11, 2010

मातृभाषेतून शिक्षण

मराठी भाषेतून शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. माणसाची जडण-घडण ज्या भाषेतून होते तीच भाषा मनात ठसते. भाषेची विविध रूपे मनात आकाराला येतात. त्यातूनच मनाचे विचार बोलू लागतात. मनातले भाव त्या भाषेतून व्यक्त होत असतात. मनाची भाषा स्वतःची अशी नसते. ती घडत जाते. अगदी बालपणापासून आधी जग पाहिले जाते. एकेक गोष्टी मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या जातात. आधी तो स्वतःला घडवतो. मगच त्याची भाषा तयार होऊ लागते.
घरात उच्चारले जाणारे शब्द. बोली. ओठातून बाहेर पडायला उतावळे होत असतात. एकदा का ते बाहेर पडू लागले की ती बोलीच ऐकतानाही छान वाटायला लागते.
एकूणच संस्काराची बीजे मनावर कोरली जातात. ती काळानुरूप विकसीत व्हायला लागताना उच्चारण्याचे शब्द बाहेर पडायला सुरवात होते. तेच शब्द येतात मातृभाषेतून. नात्यांची, संस्कृतीची खरी ओळख होते ती मातृभाषेतून. म्हणूनच प्राथमिक शिक्षणाचा पाया मातृभाषेतून दिले गेले पाहिजे.
नव्हे तो प्रत्येकाचा हक्क आहे......
या मताविषयी तुमचे विचार जुळतात काय...
नसल्यासही जरूर लिहा.....
प्रतिक्रियासाठी वाट पहातोय....

सुभाष इनामदार
email_ subhashinamdar@gmail.com
mob.9552596276

1 comment:

सावधान said...

मातृभाषॆतून शिक्षण हे केव्हाही श्रेष्ठ्च असते.