Friday, April 16, 2010

आता बोलायलाच हवे


कुणीतरी आता सांगायलाच हवे
सोसत नाही ते बोलायलाच हवे
जगण्यात आता अर्थ नाही
बदलेल म्हणणेही सत्य नाही
सारा समाज गोठलाय
महागाईच्या खाईत लोटलाय
कुणी कुणाला सागायचे
हाच खरा प्रश्न आहे
राजकारण्यांना चाड नाही
अस्तित्वाचीच ओढ आहे
डाळ, साखर, भाजी महाग झाली
दूधाचीही किंमत वाढली
त्याचे कुणाला काय?
तरीही जनता जगते आहे
सण-जयंत्या साज-या करताहेत
कुणी कुणायला सांगायचे हाच खरा प्रश्न आहे
कुणी कुणाचे ऐकायचे हाही एक प्रश्न

सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com mob: 9552596276

No comments: