Sunday, June 20, 2010

सांगा त्यांना वाईट वाटतच नाही...बाबा, तुमच्या संस्काराचे ओझे घेत आम्ही घडलोय

शाळेत बाईंनी शिकवताना गुरूजनांचा, आई-वडीलांचा मान राखा हे सांगितल्याचे स्मरते.
काहो बाबा. तुम्ही आई सारखे रागवत नाहीत. पण आम्ही तुमच्यासमोर वचकून असतो.
तुमची माया तुमच्या पाठीवरच्या थापेतून जाणवते
चुकले तर मारही खाल्ला.
तुम्ही घर उभे केले. त्यात रंगसंगती आणली ती आईने .
पण बाबा, तुमचा हात यात नकळत उभा असतो. हे आज मला जाणवते.

तुमची मुक माया. आणि शाश्वत दरारा मनात ठसलाय .

संसाराच्या रथाची दोन चाके आई आणि बाबा.
आईच्या कुशीत वाढलो. पण तुमचा भक्कम आधार होता तिला.
आज ते सारे जाणवतय.
तुमच्या न कळत..
मीही कधी बाबा होईन...
पण तुमच्या नकळत संस्काराच्या मुशीत
कधी मोठा झालो ते कळाले ही नाही.
आठवण आली तरी डोळे पाणावतात.
कडा ओल्या होतात.

वडलांची मायाच वेगळी
तिला नाही बंध नाही घाट
कधी समजणारी
तर कधी नकळत पसरलेली...

वडील म्हणा बाबा म्हणा नाहीतर पप्पा
एकच सगळ्यांचा असतो धोका
केव्हा मूड जाईल सांगता येत नाही
आले खुशीत तर कळतच नाही

आईची सर वडलांना येईल कशी
घरात असले तरी बोलतील कसे
रागाचा पारा चढेल
काही सांगता येत नाही

त्यांचे मन विशाल
जणू विस्तीर्ण रान
कुठे पाणी कुठे चारा
त्यांनाच माहितीचा थारा

थोपटतील कुरवाळतील
ताप आला तर मांडीवर पण घेतील
संतापले तर चापट देतील
रडला तरी मारतच राहतील


बोलण्यात करारीपण
वागण्यात कणखरपणा
अंगात धमक
अवाजात जरब

डोळ्यात पाणी पाहिलेच नाही
सांगा त्यांना वाईट वाटतच नाही...


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: