Tuesday, August 17, 2010

पुरुषोत्तम करंडक आता महाराष्ट्रीय पातळीवर


सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचालीला आरंभ करणारी पुरुषोत्तम करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सोमवारपासून पुण्यातल्या भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावर घुमू लागल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सहा शहरात या स्पर्धेचे वारे हळूहळू वहायला यंदापासून सुरवात होती आहे.

डिसेंबर २०१०च्या १८,१९ आणि २० या तारखांना पुण्यापुरती मर्यादित राहणारी ही महाराष्ट्रीय कलोपासकची स्पर्धा कोव्हापुरात होणार आहे. यंदा जळगाव इथेही ती होत आहे. २०१३ पर्यत ती आणखी नाशिक, मुंबई, नागपूर आशा शहरात होउन सुवर्ण महोत्सवी वर्षात याची मेगा फायनल पुण्यात भरेल.

यंदाचे स्पर्धेचे हे ४७ वर्ष असून आता ती महाराष्ट्र पातळीवरची एकमेव मानाची आणि महाविद्यालयीन पातळीवर विविध नविन कलावंतांत उत्साह निर्माण करणारी म्हणून ती गाजली जाणार आहे.

महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यींना ही लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रकाश योजना अशा विविध अंगाने आपापली क्षितीजे निर्णाण करण्याची संधी देते. कलावंत इथे आधी दिसतात. त्यांच्या अभिनला स्टेज मिळते. आज प्राथमिक आणि अंतीम असा दोन पातळ्यांवर होत असेलेल्या एकांकिका पाहण्यासाठी तिकीटांसाठी मारामारी होते.


अनेक स्पर्धा पुण्यात भरतात पण इतका उत्साही प्रेक्षक लाभलेली ही एकमेव स्पर्धा मानली जाते. जल्लोष आणि घोषणाबाजूने रंगमंदिर परिसर ३० ऑगस्टपर्यत गाजत राहणार आहे.

महाविद्यालयीन पातळीवरील मुलांच्या क्रियाशिलतेला वाव देणारी ही स्पर्धा अनेक ज्वलंत विषयही आणते. कलात्मकता आणि नाविन्याचा नवा पायंडा इथे मुळ धरतो. अनेकविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे कितीतरी चेहरे इथे दिसले मग ते व्यवसायत स्थिरावल्याची उदाहरणे आहेत

ग्लोबल मराठी कडून सर्वांना शुभेच्छा.

सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: