Friday, August 13, 2010

स्वातंत्र्यांची सुट्टी - दंगा आणि मस्ती


ही भलतीच सस्ती

स्वातंत्र्य कुणी, कशासाठी मिळविले.
त्यांच्या वेदना काय होत्या.
काय करायचय आम्हाला.
आणि कळून तरी काय उपयोग.

इतिहासाच्या पुस्तकात वाचेले तेवढे बस्स.
आत्ता आठवले तरी बोअर वाटते.

त्यांचा काळ कसा होता
आम्हाला सांगून काय उपयोग


जरा आज पहा
राजकारण बिघडलेले
समाजकारणात राजकारण

नोकरीसाठी द्यावे लागतात पैसै
आधी ओरबाडले जातो
मग लागल्यावर आम्ही लुबाडतोच


शिक्षण घ्यायचे, प्रवेश घ्यायचा तरी कठीण
ह्या नेशन मध्ये तिथेही डो-नेशन
साला, काहीच सोपे नाही
बाता मात्र वारेमाप


आम्हीही आता दमलोय
काम करून थकलोय


तुमचा स्वातंत्र्यदिन काय तो ना
कुणासाठी
पुढा-यांसाठी,
देशातल्या नागरीकांनी फक्त घरात पहायचे
जमलेत तर सलाम करायचा


यात साला लहान मुलांचा का छळ
सकाळी उठून शाळेचे तोंड पहायचे
तिरंग्याच्या प्रणामासाठी धावत सुटायचे
पालकांचीही तेवढीच देशसेवा, दुसरे काय


आमचे मात्र बरय,
नाही ताप, नाही व्याप
मजेत हिंडतो. गारव्यात पावसात फिरतो
थोडी मस्ती, थोडी चंगळ करतो





-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

9552596276

No comments: