Friday, September 3, 2010

याला आपण काय करणार.........


आफाट गर्दी. छातीचे ठोके वाढवावे असे संगीताचे मनोरे. वाहनांची मुंगीच्या पावलांनी चाललेली संथता. आणि तो नाचणारा किंवा संगीताच्या धुंदीत मश्गुल झालेला जनसमुदाय. काल दही हंडीच्या निमित्ताने हाच अनुभव तुम्हीही घेतला असेल.

याचा आनंद तुम्हाला झाला? का त्रास.


काहीही झाले तरी वातावण बदलत नाही. तथाकथिक सुरक्षादल बाजुला उभे असताना.
गर्दींचे सौंदर्य वाढतच जाणार. वाहनांची दाटी अदिकच गच्च होत जाणार.

याविरूध्द आवाज उठविण्याची ताकद आहे कुणाची. यासाठी वर्गणी गोळाकरणारे हात हजारोंचा आकडा सांगतात. काही जण तर त्यासाठी दुकानेही बंद करतात. पण दिली नाही तर काहीही करण्याची यांची तयारी असते. फक्त याचा उपयोग करून खरीच समाजसेवा घडते काय? त्यातली मूळ सुंदर, सोज्जळता साधली जाते काय?

असंख्य प्रश्न. न सुटणारे. आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे...

यातून खरेच कुणाचे काय साध्य होते. काहीच कळत नाही. समाजप्रबोधनाच्या नावाखाली होणारा हा व्यवहार आता राजकीय मंडळींच्या बॅनरखाली मिरवला जातो. आजच्या पिढीला या ना त्या कारणाने इकत्र करून आजुबाजूच्या परिसरातील लोकांचा विचार व करता हे उत्सव मिरविले जातात. त्याला अभय मिळत रहाते. ते वाढत जातात.


यात गैर काहीच नाही. ही तर आमची संस्कृती आहे. उत्सव मिरविणे हा तर आमचा हक्क बनलाय. आम्ही तो दिवसेंदिवस वाढवित आणि मोठ्या प्रमाणात वाढवित जाणार.

ज्यांच्या घरात स्वाईन फ्लू चा पेशंट आहे. जिथे म्हातारी मंडळी आहेत. जिथे एकादा आचारी माणूस आहे. यांच्याबद्दल कळवळा आहे काय? ज्यांना महागाईमुळे अक वेळचे अन्न मिळत नाही त्यांची काळजी कोण घेणार?

काय हा उत्सवाचा उपयोग. यात कोणती संस्कृती जोपासली जातीय. तथाकथित समाजधुरिणांचे याबद्दलचे वितार काय आहेत.
काहीच समजत नाही.

तुम्ही-आम्ही पहायचे. सहन करायचे. पण बोलायचे नाही.
आपण यातून मार्ग काढताना दिशा कोणती पकडायची. काहीच कळत नाही.


उपाय.. याकडे दुर्लक्ष करायचे. जे घडतेय त्यात आपण नाहीच हे समजून वागायचे.

टाळता येत नसले तरी कानाडोळा केल्याने हे सारे कमी होईल. ते वाढतच जाणार.

आशा वेळी. एकच करायचे. कानात बोळे घालायचे. डोळ्यावर पट्टी बांधायची. आणि मनात आले तरी मुग गिळून बसायचे? होय ना....



सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: