Monday, September 13, 2010

केळकर संग्रहालयातल्या गणेश प्रतिमा


पुण्यातल्या जागतिक स्तरावरच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातल्या विविध गणेश प्रतिमा ग्लोबल मराठीच्या वाचकांना शनिवार पासून सुरू होणा-या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दाखविण्यासाठी सध्याचे कार्यकारी संचालक आणि कै. दिनकर केळकर यांचे नातू सुधन्वा रानडे यांनी संग्रहालयाची दालने खुली करून दिली.

पद्मश्री दि. गं. तथा दिनकर काकासाहेब केळकर यांनी ७० वर्षे विवध वस्तूंचा केलेला हा संग्रह आज जागतिक स्तरावर एका व्यक्तिने उभा केलेला हा अनोखा आणि वैषीष्ट्यपूर्ण मानला जातो.
काकांची मुलगी श्रीमती रेखा रानडे यांच्या देखरेखेखाली आज पुण्यातल्या या संग्रहालयाचे विस्तराकरणाचे काम सुरू आहे. त्यांचा मुलगा सुधन्वा रानडे सध्या या संग्रहालयाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.

संग्रहालयातल्या विविध आकारतल्या. विविध ठिकाणच्या गणपतींच्या मूर्तींना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने संग्रहित करून त्यांची माहिती देण्याचे काम संग्रहालयाचे अरविंद निसळ यांनी केले.
दशभूजा गणपतीच्या संगमरवरी मूर्तीपासून हा गणेश मूर्तींचा एकत्रित विषय या निमित्ताने साकारला गेला आहे.


आज संग्राहलयाकडे २१ हजार विविध वस्तूंचा संग्रह आहे. त्यापैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रत्यक्षात बाजीराव रस्त्यावरील विविध दालनात मांडल्या आहेत. हे संग्रहालय अद्यावत करण्याचे आणि अधिक मोठ्या आणि जागतिक स्तरावर बवनिण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेकविध प्रयत्न चालू आहेत. तरीही आज या संग्रहालयकडे पूण्याचे भूषण म्हणूनच पाहिले जाते.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: