Friday, May 21, 2010

तारेंपासून नाटकवाले धडा घेतील ?नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.

संसाराची जशी दोन चाके ,तशी नटाच्या अभिनयाची दोन धारदार शस्त्रे आहेत. एक शरीर आणि दुसरे शब्द. दोघेही एकमेकावर अवलंबून. व्यसन या दोन्हीवर संकट आणते आणि नटाचा बनतो खुळखुळा. (शब्द कुठला वापरावा असे लक्षात घेउनच थोडा शांत शब्द घेतलाय) चांगल्या व्यसनातून कीर्ती मिळते तशी यापासूनही मिळते. पण ही होते अभद्र कीर्ती. यातून तो तर संपतोच पण त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबही विखुरले जाते. (या कुटुंबात नाट्यक्षेत्रात काम करणारे कलावंत, पडद्यामागे काम करणारे साथीदारही आले)

हा विषय आला तो सतीश तारे या कलावंताबाबतीत नाट्य निर्माते संघाने घातलेल्या बहिष्कारावरून. दारू पिऊन काम करणे, संवादात स्वतःची भर घालून नाटक बदलणे यातून सतीश तारेला कुणीही नाटकात काम न देण्याचा निर्णय घेतला गेला.
मुळात हा नट पुण्याचा. हरहुन्नरी, कलंदर. वडील जयंत तारे यांच्या फुलराणी रंगभूमिवरच्या नाटुकल्यात. बालनाट्यात काम करताना त्याचे कलागुण विकसीत झाले. ते व्यवसायाने ओळखले. आधी मालीकेत आणि मग व्यावसायीक नाटकात ता-यांचे विश्व निर्माण झाले. नाटके मिळाली पण का कोण चाणे हा तारा चमकता चमकला त्यातले तेज नाहीसे होत गेले. चेह-यावरची चमक काळवंडली. अखेरीस कीतीही ओरडून सांगितले ... तो मी नवहेच... तरी तो बाद ठरला. ठपका आला. कदाचित मालिकेतील कामे मिळण्यावर त्यांचा परिणाम होईल.

कारे बाबा सतीश... असे कसे झाले....
सांगून समजावयाचे दिवस गेले. तशी माहेरी म्हणजे पुण्यात फुलराणीचे प्रयोग आजही घडताहेत. आई अजून उभी आहे. भाउ कामे करतोय.
प्रश्न कामाचा नाही. बदनामीचा आहे.
सतीश तारे वाचून वाईट वाटले... पण तसा तु एकचटाच नाही. या व्यसनाने अनेकांना हादरा दिलाय. कांही तरले तर कांही उरले.

सहज आठवले. सतीश ...

कांही वर्षापूर्वी मोहन वाघांच्या चंद्रलेखा संस्थेचा प्रयोग. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात. हाउसफुल्ल्च्या बेतात. पण अरूण सरनाईकांचा पत्ता कुठाय. पावणे दहा वाजता. पत्ता सापडला. महाशय संभाजी बागेसमोरच्या एका उपहारगृहात पिऊन पडल्याचे कानी आले.
झाले वाघच ते . आणि नाटकाचे नावही गाठ आहे माझ्याशी... मोहन वाघांनी व्यवस्थापका सप्रे यांना जाहिर करायला लावले की प्रयोग तर रद्द. पण यापुढे अरूण सरनाईक यांची चंद्रलेखातून उचलबांगडी....
याच्या साक्षादारपैकी मी एक...
नटाचे शस्त्र ते शरीर. त्याची निगराणी करणे आणि ते धडधाकट राखणे ही त्याची जबाबदारी. पण ते पाळते कोण.? यश डोक्यात जाते की नकळे, पण हा व्यसन हा रंगभूमिला शाप आहे... एक बरे.. की मालिकांचे वरदान सध्या या नटांना मिळाले आहे.

पण बेटेहो... सांभाळा... स्वतःला आणि या संकटकाळात तग धरून जिवंत असलेलल्या नाट्यवसायाला.


आपला नाटकवाला,
सुभाष इनामदार पुणे.

subhashinamdar@gmail.com

9552596276

Sunday, May 16, 2010

सिटी प्राईड- आर डेक्कन पुण्यात सुरू


ग्लोबल मराठी साठी तयार केलेली ही व्हिडीओ स्टोरी
------------------------------------------------------------------
दिल्ली, बेंगलोर, मुंबई नंतर पुण्यात ५५ सिटचे आरामदायी चित्रपटगृह चाफळकर ब्रदर्सच्या सिटी प्राईड ग्रुपमध्ये अक्षयतृतीया- रविवार १६ मे पासून चित्रपटरसिकांसीठी सामिल होत आहे. पूर्वीच्या डेक्कन चित्रपटगृहाच्या जागेत झालेल्या राणेंच्या माॅल मध्ये शेवटच्या मजल्यावर हे सर्वसुविधांनी युक्त असे पुण्यातले अशा पध्दतीचे हे पहिले चित्रपटगृह रसिकांना आकर्षित करेल.

डेक्कन भागातली नटराज आणि डेक्कन दोन्ही चित्रपटगृहे गेली कांही वर्षे बंद होती. सिटी प्राईडच्या या दोन स्क्रिनच्या चित्रपटगृहांनी ती कसर भरून निघणार आहे.याबाबात माहिती देताना चाफळकर ब्रद्र्सचे भागीदार अरविंद चाफळकरांनी 'ग्लोबल मराठी'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या चित्रपटगृहांची सविस्तर माहिती दिली.

'अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सिटी प्राईडच्या वतीने दोन स्क्रिनचे हे चित्रपटदालन आम्ही पुणेकरांच्या सेवेत दाखल करीत आहोत. एक १८५ आसन क्षमतेचे नेहमीच्या सुविधांनी सज्ज असे असेल.यातल्या खु्र्च्या पुशबॅक पध्दतीच्या असून तर इतर सोईसुविधा अधुनिक पध्दतीच्या आहेत.


दुसरे केवळ ५५ आरामदायी आसनक्षमतेचे चित्रपटगृह आम्ही सुरू करूत आहोत. यातली प्रत्येक खुर्ची विमानामध्ये जशी झोपून, रेलून बसण्याची सोय असते तशा खास आरामदायी खु्र्च्या बनवून घेतल्या आहेत.जमीनीवर कार्पेट, बाहेर बसायला आरामदायी सोफा,पोर्चमध्ये खाण्यासाठीची सोय सारेच यात अद्दयावत तयार केले आहे. वेगवेगळे क्लब, रोटरी सारख्या संस्था आणि जे जास्त पैसे देवून अधुनिक सुविधांचा लाभ घेऊ इच्छितात त्यांचेसाठी या रिक्लायनर मध्ये चित्रपट पाहणे ही आनंदाची पर्वणी ठरावी अशी सोय करण्यात आली आहे. '

या दोन स्क्रीनच्या उभारणीसाठी अदाजे दोन कोटी रूपये खर्च आला असून मुंबईच्या झवेरी अणि झवेरी या कंपनीने अंर्तगत सजावटीचा भार उचलला आहे. दुपारच्या साडेबाराच्या शोला २०० तर संध्याकाळ आणि रात्रीच्या शोसाठी या चित्रपटगृहाचा दर ३५० ते ४०० रूपये राहणार असल्याचे चाफळकरांनी सांगीतले.मात्र पहिले काही दिवस नवा दर आकारला जाणार नसल्याचे पुष्कर चाफळकरांनी स्पष्ट केले.


मंगला, सिटी प्राईड बिबवेवाडी, सिटी प्राईड कोथरूड नंतरचे हे डेक्कनवरचे चित्रपटगृह असेल. ब्लाॅग बुकींगसाठी आणि व्यक्तीगतसुध्दा अशा चित्रपटगृहाला नक्की प्रतिसाद मिळेल
असा विश्वास चाफळकरांनी व्यक्त केला.

प्रकाश चाफळकर सिव्हिल इंजिनियर असल्याने त्यांच्या स्ल्ल्यानुसारच राणे यांनी चित्रपटगृहाच्या बांधणीचा ढाचा बनविला आहे. अर्थात आम्ही ती जागा भाडयाने घेतली असून आरामदायी अनुभव घेउन चित्रपट पाहणे हा आनंद इथे नक्की मिळेल याची खात्री चाफळकरांनी दिली.

मल्टीपेक्समध्ये देशात चाफळकर ब्रदर्स हे एकमेव मराठी नाव आहे. लवकरच सिंहगड रोडच्या अभिरूचीतल्या जागेवर तयार होत असलेल्या माॅल मध्ये सात स्क्रिनचे तर कांही काळनंतर
कोंढव्यातही सिटी प्राईडचे नाव झळकणार आहे.


सुभाष इनामदार, पुणे

subhash.inamdar@myvishwa.com
www.globalmarathi.org
95525962769552596276

सडा पारिजातकाचा-- व्हिडीओ कवीता


सुभाष इनामदार, पुणे,.


subhashinamdar@gmail.com
9552596276

महेश काळेंची ही गोव्यातली अनोखी मैफल
सध्या राहूल देशपांडे करीत असलेल्या नवीन कट्यारच्या प्रयोगात अमेरिकास्थित महेश काळे सदाशिवच्या भूमिकेमधून संगीत रसिकांच्या मनात घर करून राहिला आहे.
त्याच्या या गोव्यातल्या मैफलीची हा ध्वनीचित्रफीत.सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail.com
9552596276