Saturday, May 29, 2010

नाटक विश्र्व व्यापक व्हावे....


मराठी नाटकाची तिसरी घंटा आज जागतिक स्तरावर विश्र्व नाट्य संमेलनात वाजणार. जिथे मराठी तिथे नाटक. आज महाराष्ट्रापासून दूर असलेल्या अमेरिकेसारख्या देशात मराठी नाट्य कलावंत न्यू जर्सींच्या पहिल्या विश्र्व नाट्यसंमेलनासाठी एकत्र येत आहेत. नाटकावर प्रेम करणा-या रसिकांचे खास अभिनंदन करायचे आहे.

मराठी नाटकांची महाराष्ट्रातील अवस्था सध्या बिकट आहे. नाट्यगृहे ओस पडायला लागली आहेत. नाट्यगृहात तमाशांचे फड रंगू लागले आहेत. सभा-समेरंभासाठी आणि सास्कृतिक कार्यक्रमांची तिथे गर्दी होती आहे. मायबाप प्रेक्षक घरातच मालिका पाहण्यात गुंतून गेलाय. त्याला जागे करून रंगमंचापर्यत अणण्याची ताकद असणारी फारच थोडी मंडळी उरली आहेत. नव्हे ती आहेत. पण त्यांनी माध्यमे बदललीत. नाटकांचे दाैरे , प्रवासाचा वेळ, मिळणारी नाईट यांचा विचार करता आपल्याच गावात अभिनय करून त्यांना अधिक प्राप्ती होती आहे. कलावंताला काम मिळतेय. पण रसिकाला नाटके पहायला मिळत नाहीत.
महागाईच्या विळख्यात रसिकाला भुरळ पाडावी असे विषय लिहिणारे नाटककार नाहीत. ज्यांच्यामुळे खात्रीशार बुकींग होईल असे नटही विरळाच. तेव्हा सांगायचे काय नाट्य क्षेत्र धोक्यात आले आहे. त्यालाही तिस-या घंटेची घरघर लागली आहे.

अशा पार्श्वभूमिवर मराठी नाटकांची पताका आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात फडकते आहे. याचा आनंद कुणाला होणार नाही. मी नाटके चालत नाहीत असे म्हटले .यातल्या काही अपवादात डॉ.मीना नेरूरकरांचे 'अवघा रंग एकची झाला'ची कथा वेगळी आहे. परंपरा सांभाळून. काळाप्रमाणे तुम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न केलात तर तो लोकांना अवडतो. तोही संगीत नाटकाचा. आज त्यांचे २२५ प्रयोग झाले आहेत. त्याला रसिकाश्रय मिळाला आहे. अशी बदलत्या पिढीत रूजणारी नाटके आता परदेशात स्थायिक झालेल्या लेखकांनी लिहावीत. ती रंगमेचावर आणण्याने तरूण वर्ग आकर्षीत होईल. पुन्हा एकदा रंगभूमिकडे रसिकांचा ओढा वाढेल.

संमेलनाचे अध्यक्षपद एका संगीत क्षेत्रातल्या बूजुर्ग अशा रामदास कामत यांचेकडे आहे. हा ही एक योगायोग. बेगम बर्वे सह वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले कट्यार पुण्याचे भरतचे कलावंत सादर करणार आहेत. आणि याच नाटकाचा नवा आविष्कार घडवून संगीत नाटकांबाबातची नवी आशी पालविली गेली ती राहूल देशपांडे यांनी सादर केलेल्या कटयारमुळे.
एका बाजूला संगीताचा बाज बदलून काळाप्रमाणे सादर केलेले संगीत नाटके रसिकांच्या पसंतीला उतरत आहेत . तर दुसरीकडे कट्यारने साडेपाच तासाचे नाटक तीन तासात करून नवा बाज जमवून आणला आहे. कालच त्यांचा २५वा प्रयोगही रंगला.सुबोध भावेच्या दिग्दर्नाच्या छत्राखाली चाललेले कट्यार रसिक स्विकारत आहेत. नव्हे नाटकाला टाळ्यांची दाद मिळत आहे.

एकूणच नाट्यक्षेत्राने काळाची पावले ओळखावी. त्याची प्रेरमा मीना नेरूकरांकडून घेउन रामदास कामत यांच्या अनुभवाचा फायदा घेउन नाटकांचे नवे पर्व सुरू व्हावे. नवी दृष्टी असणारा लेखक, दिग्दर्शक नाट्यक्षेत्राला मिळावा हिच नटेक्श्र्वरचरणा प्रार्थना करू .यात.

महाराष्ट्रातून नाट्यसंमेलनासाठी गेलेले मराठी कलावंत नवी दिशा, नवी आशा आणि नवी प्रेरणा घेऊन येतील अशी अपेक्षा करतो. मराठी नाटकांची परंपरा तर टिकेलच पण अजून रंगभूमिवरचे नवे अभिसरण स्विकारण्याची ताकद या क्षेत्राला लाभावी अशी मनोमन इच्छाही व्यक्त करतो.

विश्र्व व्यापक बनत चालेले आहे. मराठी दूरवर पोचली आहे. ती मराठी ..महाराष्ट्राच्या मातीतली कला वृद्धिंगत व्हावी.......


सुभाष इनामदार,पुणे.
subhashinamdar@gmail.com


9552596276