Monday, August 23, 2010

बंधन राखीतले.....


सकाळी सकाळी महर्षी स्त्री शिक्षण संस्थेत रहाणा-या मुंलींमध्ये बरीच धावपळ होत असते. सर्व जणी नटून-थटून येणा-या भावांना राखी बांधण्यासाठी निरांजनात तेल-वात घालून तयार असतात. कांही ठराविक शाळेतली मुले या संस्थेतल्या मुलींकडून ओवाळण्यासाठी आणि राखी बांधून घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. हा संस्काराचा सोळा पाहताना. मन गहिवरून येते. संस्कृतीत आजही जपल्या जाणाःया या वेगळ्या नाते-बंधनात एकमेकांबद्दलचा जिव्हाळा. रक्त वेगळे असले तरी नात्यांत गुंतली जाणारी ती मने.

आणि कोण कुठला भाऊ. ना नात्याचा. वा गोत्याचा. त्यासाठी रांगोळी काढून. पाटाभोवताली सजविलेला थाट पाहिला की नात्याची दुरावलेली अनेक नाती सामोरी नाचू लागतात.


१४ जून १८९६ या दिवशी विधवांच्या शिक्षणाकरिता ज्या 'अनाथ बालिकाश्रमाची मंडळी' या संस्थेची महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना झाली. त्याच संस्थेत गेली अनेक वर्ष भाउबीज फंडाची भर पडते. विधवांना शिक्षण आणि मानाने जगता यावे यासाठी आरंभी काम करणारी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आज अनेकविध क्षेत्रात भरारी मारून मुलींना प्राथमिक शिक्षणापासून अधुनिक अशा फॅशन डिझाईनपर्यतची शिक्षणपध्दती शिकविण्यात पुढाकार घेत आहे.


मात्र ज्या मुंलींनी कुणीही नाही अशा कोर्टोमार्फत वसतीगृहात येणा-या मुलींच्या राहण्यापासून शिक्षणापर्यतचा भार स्वतःच्या शिरावर घेणारी ही संस्था महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून कार्य करीत आहे.

ज्यांना समाजात विचारायला कुणी नाही अशा विविध स्त्रीयांचा भार ही संस्था सांभाळते. त्यांना कांही वर्ष का होईना हक्काचा निवारा देते. संस्थेच्या या सामाजिक जाणीवेतूनही अनेक चांगले पायंडे समाजात रुढ होतात.

त्यापैकीच राखी पौर्णीमेचा हा सोहळा आहे.
ते पाहणारे संख्येने कमी असतील . पण वर्षानुवर्षे हे सारे जतन करणारे हात आजही संस्थेत राबताहेत.
नात्यातली बंधने गळून पडत असताना हा नातेसंबंधाचा नवा धागा ते जुळवून एक आदर्श नि्र्माण करताहेत. त्या कार्याला आमच्यासारख्या असंख्यांच्या शुभेच्छा.


नाती असतात स्नेह वाढविणा-या असंख्यात रुजणारी

नाती असतात प्रेम करणा-या असंख्याच्या मनात साठणारी

नाती म्हणूनच असतात बळकट

नाती म्हणूनच केवळ नसतात रेशमाचे धागे

धाग्यातली धग असते ती दोन मनांच्या ओसंडून वाहणा-या रक्तामध्येच..
राखी बांधणा-या आणि ती निभावणा-या असंख्य भावा-बहिंणांच्या प्रेमाला सादर समर्पण.सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276