Wednesday, September 22, 2010

पुणे गणेश विसर्जन सोहळासार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रसिध्द असलेल्या पुणे शहरात बुधवारी पुण्याचे पालक मंत्री, पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते मंडईतल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुण्याते ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची पुजा होऊन ठिक साडेदहाच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीला आरंभ झाला.


मंडई परिसरात एकत्रित आलेल्या तांबडी जोगेश्र्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीच्या गणपतीला अजित पवार आणि महापौरांनी मानाचा पुष्पहार अर्पण केला. पहिले चार गणपती लक्ष्मी रस्त्याने जाणार आहेत. तर टिळकांच्या केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणुक टिळक रस्त्याने जाणार आहे.


मंडईतून सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक दुपारी साडेबारपर्यत बेलबाग चौकापर्यत आलेली होती.

रांगोळीच्या पायघड्या घालून गणेश मंडलांचे स्वागत तर होत होतेच. पण यंदा विसर्जन मिरनणुकीत परदेशी विद्यार्थी, पर्यटक अधिक संख्येने दिसत आहेत.


उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, निलम गोरे, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, रोहित टिळक यांच्यासाह अनेक राजकीय नेते निरवणुकीत सामिल झालेले दिसतात. या उत्साहात महिलावर्गही बहुसंख्येने सहभागी झालेला दिसतो. नगारा बॅंड पथके आणि ढोल-ताशांच्य पथकांच्या तालावर अनेक जण या मिरवणुकीच्या आनंदात मिसळुन गेल्याचे चित्र दिसत आहे.

मानाच्या गणपतीच्या समोर गुलालाची उधळण होत नसल्याने बहुसंख्य नागरीकांनी संतोष व्यक्त केला. भक्तिमय वातावरणाने भारलेला लक्षमी रस्ता हा बुधवारी पुर्णपणे गणेशमय झालेला आहे.
यंदा विशेषतः गर्दीतही आपल्या मोबाईल कॅमेरात ह्या विसर्जन मिरवणुकीत क्षण टिपण्यासाठी सरसावलेले दिसतात.

यंदा स्वाईन फ्लू आणि जर्मन बेकरीच्या स्फोट या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.पोलिसांची विविध पथके कार्यरत असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


हळूहळू मिरवणूक पुढे सरकत जाईल तसा जोश आणि उत्साहाला अधिक भरती येईल. कितीही मानवनि्र्मित संकटे आली तरी भक्तिच्या या शक्तित कमतरता भासत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होतानाच जाणवत आहे.

यंदाचा गा गणेश विसर्जन सोहळा लवकर संपावा आशी अपेक्षा आहे. उद्या बाबरी मस्जीद खटल्याचा निकाल आहे यामुळे पोलिसांची वाढती कुमक पुण्यात दाखल झालेली आहे.

Tuesday, September 21, 2010

आता वेध मिरवणुकीचे..धूम संपत आली
मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मांडवात सत्यनारायणाची पूजा घातली जात आहे. तरी पाहणारे भक्तांची संख्या फारशा कमी झालेली नाही. एकच झाले. शनिवार रविवारच्या तुलनेत मात्र ही संख्या कमी आहे. आज दुपारी पडलेल्या पावसाच्या सरींनी गणेश मंडळांच्या मिरवणूकीच्या कामावर थोडा परिणाम जाणवेल. पण एके वर्षी गणेशोत्वसाच्या अखेरपर्यत वरूणराजा बरसत होता तरीही भक्तांचा सागर आटला नव्हता.

समजा बुधवारी पावसाने आपली हजेरी लावली तरी नाद सुरूच राहणार.. ढोल-ताशांचे फड वाजतच रहाणार... नागरीकांची पावले लक्ष्मी रस्त्याकडे वळणारच.माती गणपती मंडळ नारायण पेठेत रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळीतील रेखीवपणा आणि कल्पकता तुम्हीच अनुभवा.
माती गणपती मंडळाची मूर्ती शांत..तिथे कुठलाही भपका नाही. पुरेसा लाईट आणि भक्तिमय संगीताना वातावरणही बदलून जाते.भारती विद्यापीठाच्या नवी पेठेतल्या चौकातल्या नागनाथ अचानक मित्र मंडळाने सादर केलेला पौराणिक देखावाही लक्ष वेधून घेणारा आहे.शनिवारातल्या वीर हुनुमाच्या श्रीराम भक्तीची कथा हलत्या आणि भव्य अशा देखाव्यातून साकारली गेली आहे. यात राम भक्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा मेळ घातला आहे.

वीर तालीम मंडळाची गणेश मूर्तीच्या हातात गदा आहे. तीही लक्ष वेधून घेते.

या उलट दही हंडीची धूम साकारली ती कर्वे रोडवरच्या पाडळे पॅलेसच्या चौकातल्या नागनाथ तरूण मंडळांच्या हलत्या देखाव्याने. मुंबईतल्या चाळीची आणि गोविंदा पथकाची एकत्रीत प्रतिकृतीतून सिध्द झाली... साकारली गेली ती दही हंडी.पुणे शहरात अनेक कल्पक देखावे नटले आहेत. मात्र सारेच दाखविण्याचा अट्टाहास यावेळी केला नाही.

मात्र जे देखावे आणि सजावटी दाखविल्या त्या आवडल्या असाव्यात असा तर्क आहे.....

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, September 20, 2010

विंचूरकर वाडा जतन व्हायला हवा


एके काळी ज्या विंचूरकरवाड्याला गायकवाड वाड्याइतकेच महत्व होते. १८९४ साळी सरदार विंचूरकरांच्या या वाड्यातच लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणपती बसवला. यालाच एकेकाळी 'लॉ क्लासचा गणपती' म्हटले जायचे. आज हा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता ह्या वाड्याचा काही भाग जतन केला जावा अशी मागणी केली जात आहे.

लोकमन्यांच्या केसरीचे पहिले कार्यालय या वाड्यात होते. आजही ते ज्या भूयाराखाली बसून अग्रलेख लिहीत तेही याच खोलीत पाहता येते.१९९२ मध्ये स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक याच वाड्यात दहा दिवस एकत्र राहत होते. आणि पहिला गणपती याच वाड्यात बसविला गेला.अशा तिनही ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार असलेला हा सरदार विंचूरकरांचा वाडा आज विंचूरकरांचे नातेवाईक दाणी यांनी विकायला काढला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारकडे ह्या वाड्याच्या महत्वाबद्दल अनेक पत्रोत्तरे केली. जयंतराव टिळकांनीही हा वाडा पुरातन विभागाच्या ताब्यात यावा यासाठी प्रयत्न केले. पण सरकार कडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट,पुणे यांचे मार्फत गणपतीत दहा दिवस वाड्याचा तो ऐतिहासिक मजला गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या कामासाठी वापरला जातो.

खालच्या मजल्यावर बाळासाहेव भारदे यांचा सहकारी ग्रामोद्योग संघ आणि केसरीच्या त्या कार्यालयात महाराषट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे काम चालते.
या वाड्यातल्या गणेशोत्सवात एके काळी ह.भ. पांगारकर, प्रो. जिनतीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजीपंत खाडीलकर, चिंतामणराव वैद्य, वि.ग.भानू इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली आहेत. आजही इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कुणाच्याही पैशाची अपेक्षा न करता.

या मूर्तीचे वेगळेपण आणि या वास्तूचे महत्व लक्षात घेता भाविकांनी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी या वाड्याविषयीचे प्रेम कायम ठेऊन असा ऐतिहासिक ठेवा जपावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुभाष इनमादार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, September 19, 2010

रस्ते ओसंडताहेत,मंडळे ...घरेही..


गणपती बघायाला निघाले की कळते या उत्सवात कुणाला रोजगार मिळतो. कुणाची हीच मोठी कमाई असते. किती सामान्यांना यातून आपल्या कला दाखविण्याची संधी मिळते.
यंदा तर हा उत्सव बारा दिवसांचा आहे. मंडप डेकोरेशन. सजावट. सुरक्षा, स्वयंसेवक, पोलिस, वाहतूक व्यवस्था. सा-यांची या एका गणपती उत्सवासाठी धावपळ सुरू असते.
गर्दीत तुम्ही सहज समाविष्ट होता. चालताना पाय दुखत नाहीत. मुले आनंद घेतात. वडीलधारी मंडळींच्या सूचना धुडकावून ती धावत असतात. मग धावपळ सुरू ङोते. सारेच यात घडते.
हा उत्साह कुठून येतो. त्यातून बाहेर पडून घरी आल्यावर पाय बोलू लागतात. पण यात सामिल झाल्यावरच यातला आनंद कळतो.


गल्ली-बोळात दर एक मंडळ स्वतःचे वेळेपण जपण्याचा प्रयत्न करीत असते. कुणी फुलांचे. तर कुणी केवळ सुंदर महिरप बनवून आरास करतो. कुठल्या मंडपात केवळ प्रसन्न वातावरण मोहवून टाकते. तर कुठे एकादे छोटे कारंजे प्रकाशमान झालेले असते. असे असंख्य वेगळेपण गणपती पाहताना . त्यांची अरास पाहताना दिसते ..
तीच आज एकत्रीतपणे आम्ही दाखविणार आहोत.


घरीसुध्दा अनेक हौसेने गणपतीची अशी सजावट करतात की पाहताना त्यांच्याही कलात्मकतेला दाद द्यावी.
त्यापैकीच आनंदनगरचा हा अमोल देशपांडे. इंजिनियरींगचा विद्यार्थी पण गणपती घरी बसवायचे म्हटले की कांही तरी स्वतःचे वेगळेपण दाखविण्याचा दरवर्षीचा त्याचा प्रयत्न असतो. यंदा शंकर पार्वती गणपतीसाठी कैलासाची निर्मिती केली आहे.
चला तोही आनंद घेउयात.
सुभाष इनामदार ,पुणे.


subhashinamdar@gmail.com
9552596276