Friday, October 29, 2010

तेजाळल्या धरणीवरी



गेली ज्योतिने तेजाळत रात्र ही बहरत होती
तेजाने तळपत तेव्हा स्वतःला जागवित होती

नको भिती तिमिराची चांदणे ते उगवित होते
तेजाला साक्ष तेजाची क्षितिजात तारेही होते

काय तुला रे भिती आता तेजाळल्या नभापरी
लाभल्या क्षमल्या देही आसावल्या ओठावरी

नादाला लागला सुगावा देही चंदनाचा लेप
घेऊ किती देऊ किती ही आकाशाची झेप

झेपावया चेतावली आज दिव्याची ही ज्योत
ज्योतीतही उजळली घेते झळाळी आसमंत

आता तरी स्पर्शून जा रे रे मर्त्य मानवा
साद घेता साथ दे रे आता तरी हे आठवा

स्वपानांच्या गावा आज उजळला दिप
तेजाने तेजालाही लाभे किरणांचा स्पर्श

मनाची दारे आज उजाडली सताड
आनंदाची गाणी न उरे मारव्याची गत

चला जावू चेतवून मनांची संवेदना
संवादाला लाभली आता ही एकच कामना



सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com