Tuesday, November 23, 2010

पिंडाला शिवा रे...Response from Vachk


आजीच्या पिंडाला कावळा शिवावा म्हणून मुलांसह सगळी मंडळी तिष्ठत होती. वेळ जात होता; पण कावळे फिरकायला तयार नव्हते. आजच्या आधुनिक युगातही या सगळ्याची खरंच गरज आहे का?

----------------------------------------------------

http://www.esakal.com/esakal/20101120/4671308256829600476.htm

---------------------------------------------------


प्रतिक्रिया
On 23/11/2010 02:04 PM ahuja said:
मला वाटते रजनीकांतला जर आळवले असते तर काम ताबडतोब झाले असते
On 23/11/2010 01:34 PM Raju Bhangi said:
छान लेख आहे...त्यांनी फक्त त्यांच्या भावना मोकळ्या केल्या आहेत...धर्म विषयी काही वावगे लिहिलेले नाही, त्यमुळे लोक्कानी प्रतिकिया देत्ताना काव काव करू नये...वाचायला चांगल्या वाटतील असेच काही लिहावे
On 23/11/2010 10:55 AM vivek deshmukh said:
सर्वांनी लेख नीट वाचला काय? नुसते कावळ्यासारखे काव काव करताय!!! आपण निसर्गाला काहीतरी देण लागतोय एवढाच त्याचा अर्थ आहे!!! आणि श्रद्धेच बोलायचं तर श्रद्धेशिवाय जीवनाला अर्थ नाही
On 23/11/2010 02:27 AM Mayuri said:
Atleast hyach bahanyane kutumbatali dure manase javal yetat ani melelya vyaktichi tyane kelelya changlya karmachi athavan kadhatat he kay kami ahe. manus mela tari aaplya aathavanit to jivanta rahato tar mag kharya aso va khotya prathat palalya tar konacha kahi bighadat nahi. Ani kadachit jya tya diwasanmadhe jyataya vastula khadya padarthanna pranyanna pakshyanna mahatva denari aapali sanskruti, hya diwashi kawlyala mahatva dila tyat kay wawga aahe. Its ok I think.
On 23/11/2010 12:44 AM rajan bhambure Amerika said:
पिंडाला कावला शिवला म्हणजे, या इहलोकी मृतात्माच्या काहीही इच्छा अतृप्त नाही असे समजतात.त्याचा सर्व इच्छा, जबाबदार्या पूर्ण झाल्या आहेत असे समजतात. असे मला वाटते.ह्याबाबत धर्मशास्त्रात जर काही शास्त्र-आधार असेल,तर धर्म निपुण जाणकारांनी जरूर ह्याबाबत,विवेचन करावे,लेख लिहावेत.आम्ही जरूर त्यांचा आदर करू.
On 22/11/2010 03:50 PM radhika modak said:
मी एक प्रसंग सांगू शकते, माझे आजोबा (आईचे वडील), जेव्हा वारले तेव्हा असाच कावळा शिवत नव्हता, कित्येक गोष्टी करून पहिल्या, पण कावळा झाडावर बसून होता तो खाली काही येईना, तेव्हा एक वर्ष पूर्वीच माझ्या मोठ्या मामाची बायको वारली होती, आणि त्याची मुले लहान होती, त्याचे आम्ही परत लग्न लावून देऊ आणि त्याच्या मुलांची पण काळजी घेऊ असे धाकट्या मामाने सांगितले, तेव्हा लगेच कावळा शिवला, आणि मोठ्या मामाचे लग्न झाले तेव्हा आजोबा धाकट्या मामाच्या स्वप्नात आले होते. म्हणूनच हा ज्याचा त्याचा विश्वास आहे.
On 22/11/2010 09:13 AM sanju said:
पिंडाला कावळा शिवला कि मृतात्म्याची इच्छा पूर्ण झाली असे समजतात, पण त्यांच्या जीवन्तापानीच त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या त्यांच्याशी नित वागावे, पिंडाला कावळा शिवला नाही तर दुखी होण्याचे कारण नाही,
On 22/11/2010 08:53 AM Aniket said:
मि. इनामदार, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाहीत असे दिसते. डॉक्टरने औषध दिले तर लगेच घेत असाल मग गुण येओ अथवा न येवो. ही झाली श्रद्धा व पिंडाची प्रथा म्हणजे अंधश्रद्धा असा तुमचा सोयीस्कर विचार वाटतो. हिंदू शास्त्र पद्धती ही modern science पेक्षा खूपच advance आहे तरी असे काही पुन्हा लिहू नका. तुमचा बाबतीत "विमुडा नानी पस्चान्ति पास्चान्ती न्यानी चक्षुषा" असे आहे.
On 22/11/2010 04:13 AM shardul said:
अहो इतर कितीही गोष्टीनी आपणास त्रास झाला तर चालतो पण धर्मात सांगितलेल्या गोष्टीने थोडावेळ उपाशी राहण्याचा त्रास आपण सहन करू शकत नाही. कसे काय हिंदू म्हणून टिकून राहू? ख्रिस्ती लोक धर्मप्रचारासाठी जंगलात जाऊन राहतात, मुस्लीम जिहाद करतात आणि आपण नुसते थोडावेळ उपाशी राहू शकत नाही. पाळली हि प्रथा तर कुणाच्या बापाचे बिघडले? आणि एवढे वाईट वाटत असेल तर मुस्लिमांना जिहाद वेगेरेचा फोलपना समजून या.
On 22/11/2010 02:40 AM Shashikant Inamdar said:
ज्या गोष्टीबद्दल आपणाला पूर्ण माहिती नाही त्याबद्दल आपण मत व्यक्त करू नये. ह्या गोष्टी मुले आपण अनेक जणांची दिशाभूल करतो. ह्या सर्व गोष्टी सायन्स पेक्षा फार वरचढ आहेत.
On 22/11/2010 02:09 AM me said:
माझ्या मते रूढी जोपर्यंत जाचक होत नाहीत तोपर्यंत पाळाव्यात. कित्येकदा कावळा शिवला नाही म्हणून लोक उन्हात ताटकळत उभे राहतात, काहीना मग chakaar आल्याचे ऐकिवात आहे. जिवंत माणसांची आबाळ करून गेलेल्यांचे इच्छा पुरती करणे कितपत योग्य आहे? हिंदू धर्मात पुनर्जन्म मनाला जातो. मग आपण पुढल्या जन्मात राहिलेल्या इच्छा पूर्ण का करू नयेत?
On 21/11/2010 01:05 PM vidyadhar Deshpande. said:
लेखकाने कावला पिंडाला शिवा म्हणून मृत याक्ती ची इच्छा यकत करायला हवी होती. लेक्कानी आणि वर लिहिणार्याने धर्मात प्रत्येक विधी का करतात त्या मागे काय उदेश असतो हे शास्त्र काय म्हणते हे पुस्तक वाचवे .मृत याक्ती ची राहिलेली इच्छा पूर्ण करणे हि मुला चे कर्तव्य आहे. ते त्याने पार पडले आसे वाटत नाही
On 21/11/2010 12:59 PM s k purandare said:
कशाला रे हिंदू धर्मात जन्माला aalas
On 21/11/2010 12:06 PM raje said:
@इनामदार : अहो साधी गोष्ट आहे, कावळा आधीच भरपेट तृप्त झाला असेल तर तो कशाला आणखी खायच्या नादाला लागेल ( तो काही कलमाडी नाही ). लोकांनी काहीही सांगावं आणि बाकीच्यांनी ते निमूट पणे मानावं ह्याला गुलामगिरी नाहीतर आणि काय म्हणणार? धर्म म्हणजे पूर्वीच्या काळी माणसांच्या टोळ्यांना घालून दिलेले नियमच आहेत (त्या टोळ्यांमध्ये सुसूत्रता आणि वळण राहावे म्हणून) त्या नियमांचा आता अपभ्रंश झाला आहे. फक्त विज्ञानच काय सत्य आहे हे पटवून देवू शकतं, बाकीचे फक्त समज रूढी आणि परंपरा --- राजे
On 21/11/2010 08:54 AM Rohan said:
पूर्वी लोकांना कुठल्याही विधीमागील शास्त्रीय कारण सांगितले तर ते त्यावर बहिष्कार टाकत. त्यामुळे लोकांना समजेल आणि त्यांचा विश्वास बसेल असे काही कारण सांगावे लागे. कदाचित पिंडाला कावला शिवणे ह्यामागे सुद्धा काही शास्त्रीय कारण असेल.
On 21/11/2010 07:30 AM sasonkar yardena israel said:
विज्ञान कितीही पुढे गेले तरी काही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत.येथे इझ्रेल मध्ये कावले येत नाहीत.. आले तर त्यांना गोळी घालून मारून टाकतात. हे हिंदू धर्माचे संस्कार आहेत. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल तर हे सर्व आव्श्श्यक आहे.... हे माझे मत आहे. sasonkar yardena israel
On 20/11/2010 11:06 PM Suhas Inamdar said:
विज्ञान कितीही पुढे गेले तरी काही गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे जन्म, मृत्यू, मृत्युनंतरचे जीवन ई. एकाच ठिकाणी, एकाच प्रकारचे पिंड, तेच कावळे असूनही काही वेळेस कशाला शिवतात आणि काही वेळेस कशाला शिवत नाहीत ह्यास विज्ञानाकदे समाधानकारक उत्तर नाही. बऱ्याच समजुतींपैकी एक अशी आहे कि कावळ्यांना आत्मा हा दिसत असतो. ज्या आत्म्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, ते आत्मे त्या पिंदाकडे येतात आणि कावळ्यांना हाकलून लावतात.
On 20/11/2010 07:44 PM raje said:
काहीतरी स्वार्थी लोकांनी आपल्या फायद्या साठी लोकांच्या गळी मारलेले तत्वज्ञान मूर्ख लोक आजवर पाळत आलेत. कावळा शिवला काय आणि कुत्रा शिवला काय काय फरक पडतो ? आणि ह्या गोष्टींचे समर्थन म्हणजे तर अजबच प्रकार झाला. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवा आणि डोळस पणे जगा. ----- राजे
On 19/11/2010 11:02 PM dilip said:
माझ्या माहितीतील एका दशक्रीयेला ओमकारेश्वर (पुणे) येथे पहिले कि कावळा पिंडाला शिवत नव्हता. थोड्या वेळाने दुसऱ्या कोणाचा पिंड त्याचे जवळच ठेवला होता .त्याला कावळा शिवला मात्र माझ्या माहितीतील दशक्रीयेला कावळा शिवला नाही. शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणार्याने ताबडतोब निष्कर्ष काढू नयेत. स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे व नंतर तो सांगण्यास येत नाही.हीच पंचाईत आहे.
On 19/11/2010 10:01 PM reader said:
माझे धर्म dynan कच्चे आहे हे मान्य करून देखील कावळ्याचा पिंडाशी काय संबध ते देव जाणे.म्हणजे कावळाच का इतर पक्षी नाहीत कारण चिमणी, कावळा हे पक्षी common आहेत -उगीच भारद्वाज नको कारण तो कुठून येणार? बर्याच माणसाना हि भीती असते कावळा शिवला नाही तर उगीच अतृप्त इच्छा आपल्याला भोवायला नकोत म्हणून त्या दिवशी कावळ्याला प्रतिष्ठा. जिवंत माणसाशी नीट वागा म्हणजे मेल्यावर इतका खटाटोप करावा लागणार नाही.
On 19/11/2010 09:53 PM Avadhut said:
-------या बाबतीत "शास्त्र के सांगते" हे पुस्तक चांगली माहिती देणारे आहे.शेवटी जिथे ज्याची श्रद्धा तो त्याचा देव- काही लोक कर्म करून ते करतात हाच फरक.--यात कोणाला काय वाटेल या हेतूने केलेले कोणतेही कर्म मूळ उद्देश ला धक्का देते -- जर करायचे नसेल तर न करणे चांगले --उगाच कावळ्यांची वाट पाहून लोकांना त्रास नको आणि तर्काचे मोजमाप नको--कारण हिंदू संस्कृती काय सांगते हे महत्वाचे!
On 19/11/2010 09:45 PM Avadhut said:
---घड्याळाकडे बघून श्राद्ध केले की कावळा आपल्या ऑफिस च्या सोयिने येत नाही -- मुळात यावर विशवास असेल तर करावे --नाहीतर न केलेले बरे -हिन्दू हि अत्यंत उच्च संस्कृति आहे -- सर्व विधी समजून घेतले तरच त्याला अर्थ आहे --आपण दगडाला देव मानतो असे म्हणतात --याचा अर्थ निर्जीव दगडात पण देव पाहणारी आपली संस्कृति आहे- मज़े मत पुरोगामी असेल पण जिथे आनंद साजरा करतो तसेच हे ही करावे श्रद्धेने --नाही केले तरी चालेल --उगाच कोण काय म्हणेल याचा विचार केला तर काहीच उपयोग नाही.
On 19/11/2010 09:41 PM Avadhut said:
श्राद्ध हा संस्कार ला श्रद्धे चे अधिष्ठान आहे --जिथे श्रध्दा नाही ते श्राद्ध कसले ? -हिंदू धर्म पुनर्जन्म आणि मुक्ती या गोष्टी मानतो-- श्रद्धा च्या वेळेस अवयव श्राद्ध असते --कि जर पुन्हा जन्म झाला तर तो शरीराने कोणतीही व्याधि घेवुन नसावा --कावला शिवणे हे मुक्ती चे प्रतिक आहे -- 10 दिवस आत्मा दिव्या रुपी असतो तो काक स्पर्शाने मुक्त होतो --कित्येक वेळेस १०० कावळे येवुनाही १ पण शिवत नाही.
On 19/11/2010 08:46 PM आशिष (Malaysia) said:
धर्मही हि अफूची गोळी आहे हे खरेच . हे गोळी वेदना शमे पर्यंत घावी त्याचे व्यसन करू नये आपल्या चालीरीती ह्या शाश्त्रोत्र आहेतच पण बरीच कर्मकांडे हे शतकापूर्वीच्या काळात योग्य होती .सिमेंटच्या जंगलात आज कावळा पिंडाला शिवण्यासाठी मिळणार का ? त्या ऐवजी दहावायला दहा गरीब माणसाना जेऊ घालून अथवा एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च केल्यास .मृत आत्म्यास नक्की शांती मिळेल . अर्थातच शेवटी ज्याचीई त्याची इच्छा .
On 19/11/2010 08:17 PM sharad sohoni said:
हल्ली आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार करतो का? आपण आपल्या आई वडिलांची सेवा त्यांच्या हयातीत करावी.हे कितीजण करतात? मात्र ते गेल्यानंतर त्यांचे दिवस करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो.हे योग्य आहे का? रूढी आणि परंपरेचे पालन ज्याला जेवढे रुचेल,पटेल,आणि झेपेल त्याप्रमाणे करावे. त्याची कुणावर सक्ती नसावी. उगाचच कठल्याही गोष्टीचे अवडंबर करू नये. शरद सोहोनी
On 19/11/2010 08:12 PM supriya said:
कि अशा गोष्टी परंपरा यांना नक्कीच एकही तरी अर्थ असावा.. फक्त आपल्याला तो अर्थ माहित नसतो म्हणून आपण त्याला कर्मकांडे वगैरे नाव देऊन नाकारतो.. पण त्यामागचे logic माहित झाले कि अश्या गोष्टींना कर्मकांडांचे नाव कोणीच देणार नाही..
On 19/11/2010 08:09 PM supriya said:
या प्रथा विचार करूनच बनलेल्या आहेत आणि त्यामागे काही तरी कारण नक्कीच असते.. कधीतरी सकाळ मधेच एक लिख वाचल्याचे आठवते.. नेमका लेख पूर्ण आठवत नसला तरी इतके आठवते कि लेखिकेच्या मुलाला चान मार्क्स पडले त्याची एका हॉल मध्ये पार्ट्य चालू होती..मेन्यू मध्ये बटाटा पुरी होती..आणि लेखिकेच्या आईचे नुकतेच निधन झाले होते.. पुरी बघून लेखिकेला आईची आठवण झाली..आणि त्यंनी आईच्या फोटो समोर पुरी ठेवली आणि तिची आठवण keli..तेवढ्यात कसा कोण जाने पण चक्क हॉल मध्ये एक कावला आला व पुरी घेऊन उडाला.. त्यावरून असे वाटते..
On 19/11/2010 08:07 PM sunny govekar said:
कदाचित पुण्यातले कावले पण हव्रात असतील पण माझा ह्या प्रथेवर विश्वास आहे , असे ऐकले आहे कि बरीच पिंडे एकत्र असली आणि काव्लेसुद्धा खूप असले तरीसुद्धा कावला पिंडाला शिवेलाच असे नाही बर्याचदा थांबावेच लागते . आणि अजुनी शास्त्राने बर्याच गोष्टींचा छ डा लावायचा आहे , अजुनी आपण झालो कसे हे नक्की माहित नाही .
On 19/11/2010 07:42 PM charu said:
मी पूर्णपणे लेखकाच्या मताशी सहमत आहे. हिंदू धर्मात अथवा धर्मग्रंथात कोठेही लिहिलेले नाही की पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. आयुष्यभर चांगले काम करीत राहिल्यानेच मोक्ष मिळतो असे आहे. या अंधश्रद्धा ज्यांना पाळायच्या असतील त्यांनी जरूर पाळाव्या - हा भावनेचा प्रश्न आहे. पण शेवटी त्या अंधश्रद्धाच.
On 19/11/2010 07:25 PM nilambai said:
आपल्या प्रथा चुकीच्या म्हण्याआधी त्या का आहेत यामागची कारण मीमांसा समजून घेणे महत्वाचे आहे आणि अभ्यास करायला पाहिजे त्या सरळ मोडीत घालण्या पूर्वी.
On 19/11/2010 05:49 PM Kedar Agnihotri said:
Maza Hindu dharmawar purn vishwas ahe. Aajkal jag pudhe chalale ahe chya navakhali, aplyala soyiskar te uchalane ani bakiche sodun dene yachi savay ch zali ahe. Kunalach kuthlich bandhane palayala awadat nahit. Junya goshti kahi vichar karun kelya ahet, tyachi palanuk hi garajechich ahe. Inamdar saheb tumhi ekda asa pan vichar karun paha ki kharach tyaveli kawala tithe ka ala nahi. Itar weli tar bhat khayala kawala kuthunhi yeto.
On 19/11/2010 05:21 PM Vaibhav Kirpekar said:
लेखक सुभाष इनामदार जी, हि काही लोकलज्जा वगैरे काही नाही, आपण कितीही तंत्राद्यानाने पुढे गेलो तरी तंत्राद्यान सांगत नाही कि तुमची संस्कृती विसरून जा ! आणि हो जशी दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, लग्न, मुंज, बारसे समारंभ आहेत तसेच हे हि एक आपल्या हिंदू संस्कृती मधील कार्यच आहे! आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. असे माझे मत आहे ! बाकी वाचक सज्ञान आहेत ! वैभव किरपेकर, पुणे
On 19/11/2010 04:29 PM suresh topkar said:
हे हिंदू धर्माचे संस्कार आहेत. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत असाल तर हे सर्व आव्श्श्यक आहे. सुधारणा , लोकलज्जा वगैरे काही नाही. कोणत्याही बाबतीत (उदा. धर्म) आपली निष्ठा प्रखर असतील तर त्याच्या पालनाने फळ उत्तमच मिळते.त्रास झाला तरी हरकत नाही.

रंगभूमीने काळाप्रमाणे बदलायला हवे

-मनोहर कुलकर्णी

बदलत्या काळाचे स्विकारणारी नाटके रंगभूमिवर येत नाहीत. योग्य भूमिकांना त्या योग्यतेचा कलाकार नाटकात काम करताना दिसत नाही. वाढत्या मालिकांच्या प्रभावामुळे रंगमंदिराकडे मुद्दाम यावे अशी नाटकेही आज येत नाहीत. जी गोष्ट गद्य नाटकाची तीच संगीत नाटकाची आहे. तरीही सुदर्शन रंगमंचावर होणारी चळवळ . तिथे होणारी आजच्या पीढीने आजच्या प्रेक्षकासाठी केलेली नाटके यातून रंगभूमि तग धरून आहे. काळाप्रमाणे वदतलणा-या `अवघा रंग एकची झाला ``सारखी आपली परंपरा आणि आजचा काळ यांची मेळ घालणा-या संगीत नाटकांचे प्रयोग ह्यातून आशादायी चित्र दिसत आहे. थोडे फार नाव मिळाले की कलाकार मालिकेसाठी जातो. त्याला इकडच्या नाईटपेक्षा तिथे पैसा जास्त मिळतो. मग तो तिथेच रमतो. पुन्हा नाटकाकडे फारसा फिरकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजची रंगभूमिची स्थिती पाहून निराश आहे. मात्र ती बदलण्याची ताकद तरूणाईमध्ये आहे. त्यांनी नाटकाकडे गंभीरपणे पहावे असे वाटते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचा `जीवनगौरव` पुरस्कार मिळालेले आणि ज्यांची सारी हयातच नाटकांचे व्यवश्थापन करण्यात गेले ते मनोरंजनचे ८३ वर्षाचे मनोहरपंत कुलकर्णी तळमळीने हे सारे सांगत होते. त्यांना बुधवारी जयंतराव टिळक स्मृती प्रित्यर्थ पंचवीस हजार रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सा-या नाटकवाल्यांचे `आण्णा` आजच्या नाटकांविषयी तळमळीने आणि पोटतिडकीने बोतल होते.
आर एम एस मध्ये सॉरर्टरची नोकरी करून त्यावेळचे आपले मित्र नाना रायरीकर यांच्या साथीने १९५६ पासून भालचंद्र पेंढारकरांच्या ललितकलादर्शच्या व्यवस्थापनाची पुण्यातली जबाबदारी घेणारे भागीदार मनोरंजन यानावाने व्यवसायत आले.. गेली ५४ वर्ष याव्यवसायात अनेक अनुभवांनी समृध्द झाले. अनेक अनुभवातून शिकले. अनेकांना नाटके करण्यासाठी आर्थिक बळ दिले. त्यातल्या कांहीनी पैसे डुबवले ते विसरून आजही ८४च्या उंबरठ्यावर मनोरंजनचा सारा भार आपले पुत्र मोहन कुलकर्णी याच्यावर सोपवून स्वतः क्रियाशिल राहून हिशेबाचा सारा भार पेलत ताठ मानेने आणि नाटकांचे अवलोकन करीत नाट्यव्यवसायाची चिंता करीत आहेत आनंदी जीवन जगत कार्यरत आहेत.
पुण्याबरोबर नाटकांचे दौरे आखणे. त्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्थापनाची बाजू सांभाळून अधिकाअधिक प्रयोग करण्यासाठी संस्थांना मार्गदर्शन करणे. प्रसंगी त्यांना लागेल तशी आर्थिक मदत करणे. कलावंतांना काय हवे ते पहाणे. त्यांचे स्वभावाप्रमाणे त्यांचा मुड सांभाळत `शो मस्ट गो ऑन `या न्यायाने सारी मदत करण्याचे सौभाग्य यानिमित्ताने मनोरंजनच्या मनोहर कुलकर्णी यांना लाभले. ललितकलादर्श, नाट्यसंपदा, चंद्रलेखा, लता नार्वेकरांची श्री चिंतामणी, दादा कोंडके यांची विच्छा माझी पुरी करा, धनसिंग चौधरी, थिएटर अकादमी, पीडीए. किती नावे घ्यावीत त्यांचे व्यवस्थापनाचे काम त्यांनी केले. अनेकांनी पैशाला टगंग मारली. त्यातूनही तरले. मात्र यातून कित्येकजण मित्र बनले. त्यातिथे मग पैशापेक्षा माणुसकीच्या न्यायाने कायमची साथ केली. त्यांचे तंत्र सांभाळले. त्यांच्या घरातलाच एक सभासद झालो. याचा अधिक आनंद आहे.
वाईसारख्या छोट्या गावातून ४६ साली ते पुण्यात आले. ४७ ला त्यावेळच्या मुंबई विद्यापीठाचे मॅट्रिक झाले. रावसाहेब शिंगरे यांच्याकडे राहून. घरची कामे करून शिकण्याची जिद्द बाळगली. त्यांनी बाहेर काढल्यावर नाना रायरीकरांच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहिले.. दूधाचे रतीब घातले. सायकल घेवून RMS मध्ये शेवटपर्यत काम केले. भालचेद्र पेढारकर भेटले आणि मनोरंजनचा पाया रोवला गेला. एका खोलीत तीन मुलांसह अठरा वर्ष संसार केला. अनेक वर्षानंतर गुलटेकडीला बंगला बांधला. मी आणि नाना( रायरीकर) नोकरीत म्हणून डॅडी लोणकरांना भागीदार करून घेतले. नाटकांचे दौरे केले. चित्तरंजन कोल्हटकरांसारखे कलावंत मित्र भेटले..काशिनाथ घाणेकरांसारख्या कलाकाराचा सहवास भेटला. नाती द़ढ होत गेली. मनोरंजनची वाटचाल सुरूच राहिली.
`वयानुरून आता सारा भार मोहनवर सोपविला आहे. तो नव्यापध्दतीने मनोरंजनते बळ वाढवित आहे.`
बोलताना ते गत आयुष्याबद्दल सांगताना त्या काळात मलाही घेउन गेले. हौशी कलावंत म्हणून भावबंधनमध्ये मनोहरची भूमिका केली. RMS तर्फे नाटकात भूमिका केली. एका चित्रपटातही छोटी भूमिका केली. कलावंत हापता आले. संगीत नाटकांचा बहर अनुभवला. गद्य नाटकांची पारायणे केली. संस्था पाहिल्या. माणसांचे नमुने पाहिले. अनुभव घेतले. अनेक नाटकवाल्यांना सल्ले दिले. परखड मते मांडली. संगीत नाटके पाहण्याची भारी आवड. तीही पुरी झाली. तो काळ पाहता आजचे चित्र पाहताना विराश होतो. इतकेच.
जयंतरांव टिळकांनी नाट्यपरिषदेला टिळक स्मारक मंदिरात जागा दिली. अनेका नाटकांना प्रेत्साहन दिले. जयंतरावांच्या नावाने पुरस्कार मिळतोय याचा अधिक आनेद आहे. हा व्यवसाय बहरत रहावा. पुन्हा एकदा रंगमंदिर फुलेले पहावे हित इच्छा आहे.
-------------------------------------------------------------------------------------
( जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने मनोहर कुलकर्णी यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या त्यातून त्यांच्याकडून मिळालेल्या अनुभवावर आधारीत हा लेख तयार केला आहे.)


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
mob- 09552596276

Sunday, November 21, 2010

कलावंताने कलेशी एकनिष्ठ रहावे


कलावंताने शेवटपर्यत कलेशी एकनिष्ठ राहून सतत विद्यार्थी बनून नवे शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला सतत नवे काहीतरी मिळत असते. हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या दोन्ही भगिनिंनी नवीन पिढी , नवे श्रोते निर्माण केले. आजच्या कलाकारांनीही तसाच प्रयत्न करावा, अशी सूचना ज्येष्ठ व्हायोलिन वादक फैय्याज हुसेन खॉ यांनी आजच्या तरूण कलाकारांना केली.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्ताने तरूण सारंगीवादक साबीर खॉ यांना फैय्याज हुसेन खॉ यांच्या हस्ते शनिवारी सवाई गंधर्व स्मारकात पुरस्कार देण्यात आला. सरस्वती संगीत अकादमी आणि संवाद या संस्थेच्या वतीने रोख ७५०० हजार रूपये, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. गायकाच्या मागे साथ करणा-यांना गायकांपेक्षा अधिक मेहनत करावी लागते पण त्यांचा य़थोचित सन्मान केला जात नाही. आज सारंगीए दुर्मिळ आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने सारंगीवादनाकडे तरुण कलावंत वळतील आशी आशा फैय्याज हुसेन खॉ यांना वाटते.
पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना साबीर खॉ यानी आपले वडील सुल्तान खॉ यांच्याकडून सारंगीवादनाचा हा वारसा आपणाकडे आल्याचे अभिमानाने सांगत हा पुरस्कार हा सन्मान वाकेही सपनेसे कम नही अशी भावना व्यक्त केली.
पुरस्कार समारंभानिमित्त आयोजिलेल्या संगीत मैफलीत साबीर खॉ यांनी आपल्य़ा नजाकतीने श्रोत्यांना जिंकून घेतले. राग सरस्वती सादर करून ती सरस्वतीबाईंना आदरांजलीच वाहिली. त्यांना तबला साथ केली ती अरविंदकुमार आझाद यांनी.
व्यंकटेशकुमार आणि स्ररस्वतीबाईंची नात मीना फातर्पेकर यांच्या गायनाने संगीतप्रेमी तृप्त झाले. त्यांना साथ होती हणमंत फडतरे (तबला) आणि प्रमोद मराठे(संवादिनी)यांची.
सा-याच कार्यक्रमाचे निवेदन शैलवा मुकुंद यांनी केले तर संवादच्या सुनिल महाजन यांनी आभार मानले.