Wednesday, December 15, 2010

पुणेरी `गोडबोल्याची` एकसष्टी


जन्मजात पुणेरी बाणा अंगात आणि स्वभावात रूजविणारा तमाम मराठी रसिकांच्या समोर असणारे नाव म्हणजे सुधीर गाडगीळ. आम्ही काही जण त्यांला गोडबोलेही म्हणतो.सदाशिवपेठी पुणेरी भाषा सुधीर गाडगीळ यांच्या नसानसातून फिरत असल्याने त्यांच्या सा-या मुलाखत तंत्रात पुणेरी स्पष्टपणा डोकोवणे सहाजिकच नाही काय ?

पंचवीशीपर्यत मुंकुंदराव किर्लोस्करांच्या साप्ताहिक मनोहरात पत्रकारितेची उमेदीची वर्षे सुधीर गाडगीळांनी घालविली...नाही त्यामुळेच ते घडले.. दिसले आणि सर्वत्र संचारु लागले. कॉलेजमधल्या नायकासारखे उमदे रुप. झकपकीत पोषाखी ऐट. दिमाखदार बोलणे आणि सतत रूपेरी पडद्याच्या जवळ जाणा-या या तरूणाला साप्तकाहिकाच्या रुपाने संपर्कमाध्यमच साध्य झाले. अनेक मुलाखती शब्दात उमटू लागल्या. त्यांची वाहवा मिळाली. खरे तर हीच संधी पुढे रंगमंचीय स्थिर झाली ती स्वरानंद या संस्थेच्या मंतरलेल्या चैत्रबनात या गदिमा गीतांच्या कार्यक्रमातील निवेदॉकाच्या भूमिकेत. सुधीर मोघेंनंतर सुधीर गाडगीळ या निवेदकाच्या भूमिकेत रुजले आणि सजलेही. या निमित्ताने महाराष्ट्राला एक सूज्ञ . पुणेरी भाषेचा. सुसंस्कृत मुलाखतकार मिळाला.

रंगमंचावरचे निवेदन भावेनेच्या भरात श्रोत्यांच्या घरा-घरापर्य़ंत जाउन पोचले. अस्सल मराठी सुसंस्कृत किस्से आणि विनोदाचा बाज घेऊन `सुधीर गाडगीळ` नावाला वयल येत गेले. रंगमंचावर गदिमा, बाबुजी यांच्याशी गप्पांचा फड मारता मारता दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर गाडगीळांची वाणी प्रकट होउ लागली. आशा भोसले आमि सुधीर फडके यांच्या मुलाखतीच्या रूपातून गाडगीळ मराठी माणसांच्या जवळचे झाले.

विषयाचा अभ्य़ास आणि तात्काळ व्यक्त होण्याची हातोटी साधल्याने त्यांचे ते प्रश्न कलावंतांमधली प्रतीमा अधीक उजळ करायला मदतच झाली. पण पुढे गाडगीळ काय चिमटे काढतील याचा नेम नसल्याने कलावंतही सावध होत. भाषेतला मवाळपणा आणि शब्दातले बोचरे वळण यातून मुलाखत रंगत जायची. मुलाखत घेणारा आमि रसिक यातले अंतर कमी होण्यास यामुळे मदतच झाली.पुढे कार्यक्रमा वाढले. वाहिन्यात वाढ झाली. तरी गाडगीळ तेच राहिले. साधे आणि तेवढेच खोचक पुणेरी बोलणारे.
नोकरी केव्हाच सोडून दिलेली. निवेदक आमि मुलाखतकाराची झूल अंगावर घेतली आणि हा शब्दभ्रमाचा खेळाडू महाराष्ट्रातच काय जगभरातल्या मराठी माणसांच्या जवळ गेला. उड्डाण झाले. परदेश पाहिला. मनमुराद आनंद घेतला. त्यांनाही तो दिला. दिवाळी पहाट म्हणू नका, समारंभातले साधे सोपे वाटणारे निवेदन म्हणी नका जिथे-तिथे त्यांचीच मोनॉपॉली झाली. त्यांच्या वाणीने जग जिंकले म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणूनच सुधीर गाडगीळ एक सांस्कृतिक संस्थान ठरले. अनेक संदर्भ. अनेक इतिहास आणि अनेक माणसे त्यांच्याशी जोडली गेली आहेत.

तसा हा गप्पीष्ट माणूस. पण संसारात वहिनिंच्या आजाराने खचलेला आणि आता एकला चालो रे च्या धोपट मार्गावर वाटचाल सुरू आहे. कलावंत मित्र झाले. संस्था मिळाल्या. राजकीय नेत्यांच्या जवळीक लाभली. पण कधी हाततल्या लेखणीची आणि वाणीचा कधीही दूरोपयोग केला नाही. सात्वीकता आणि प्रेमळता आजही एकसष्टीच्या उंबठ्यावर झिरपत आहे.

घराला घरपण आलेय. मुलांनी पंख मोठे केलेत. नातवांनी घरात पसारा केलाय. भिंती रंगवल्यात. पण हा आजोबा झालेला सुधीर आजही तेवढाच हसतमुख आहे. चेह-यावरची तुकतुकी कमी झालीय. थोड्या अस्पष्ट रेषाही उमटायला लागल्यात. पण मन तरूण आङे.
शब्दात बळ आहे. ताकद आहे. आमच्या सर्वाचा हा मित्र असाच आनंदी रहावा. त्याला हसतमुखच पहात रहावे. त्यांच्या इच्छांना नवे बळ मिळावे..... असाच धीराचा चेहरा इतरांनाही आधार वाटावा.

काल ती व्याक्ती होती...आज ती संस्था बनली......... त्याच्या कर्तृत्वाला सलाम....आनंद देत आणि घेत रहा.........

तुझाच मित्र म्ङणवून घेणारा
सुभाष इनामदार,पुणेsubhashinamdar@gmal.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob. 9552596276