Sunday, February 27, 2011

भाडेकरूच्या शोधात .......


गेली तीन महिने मी मेहनत घेतो आहे. भाडेकरू शोधायची. खरे म्हणजे भाडेकरु मिळतोय. पण व्यवहारात जमत नाही.
जाहिरातीत लिहले भाडेकरू अमुक जातीचाच हवा. फोन आले पुष्कळ पण डिपॉझिट आणि भाड्याचा आकडा पाहून जागा पहायलाच धजावले नाहीत.

तशी माझी अपेक्षा काही फार नव्हती. आजच्या परिस्थतीत ती सहजी शक्यही होती. पण नियम आणि अटींची पूर्तता करताना भाडेकरू म्हणून येणारा माणूस पुढे सरसावत नव्हता. त्यातले दोन आले . घर पाहिले. पसंतही पडले. पण घोडे पुढे सरकरले नाही.

तशा माझ्या अटी फार काही वेगळ्या नव्हत्या.
१. डिपॉझिट.....
२. भाडे....
३. भाडेकरूने लाईट बील भरले ते जपून ठेवायचे..
४. सोसायटीची दरमहाची वर्गणी त्याने भरायची..
५. अकरा महिन्याचा करार आधी रितसर करायचा
६. आणि अकरा महिन्याचे चेक आधी द्यायचे..

थाडी माझी माहिती द्यायचो. त्याची माहिती विचारायचो.
एक मात्र होते थोडे प्रश्न जास्तीचे विचारायचो...कधी कधी थोडी अधिकच माहिती द्यायचो.
एकाला दक्षिणेकडचा दरवाजा खटकला. तर दुस-याला भाडे जास्तीचे वाटले....
एकूण काय तर भाडेकरुचे नक्की होत नव्हते..

अखेरीस एकांच्या ओळखीने चांगल्या कंपनीतला माणूस भेटला. त्यांची बहिण घर पाहून गेली. डिपॉझिट आणि भाड्यातही कपात मान्य करून...नक्कीचे ठरले.
भावाला रहायचे होते. त्याला घर पाहयला सांगितले. त्यालाही सारे मान्य झाले. त्यांने दहा हजाराची रोख रक्कम देऊही केली. मी ती नाकरली .म्हटले.. तुम्ही बाकीची रक्कम कधी देता...
तुम्हाला बाकीचे डिपॉझिट दोन दिवसात देतो. आधीची जागा खाली केली की डिपॉझिट मिळेल..त्यानंतर तुम्हाला देईन..
मी म्हटले, तुम्ही पुढच्या तारखेचा चेक द्या..मला चालेल. मात्र ११ चेक भाड्याचे हवेत. हो ना करता करता मान्य झाले.

आठ दिवस तसेच गेले....
दिवस पुढे सरकत गेले..
मीही ते विसरून गेलो...
आठ दिवसांनी फोन आला.. पैसे चेक तयार आहे केव्हा भेटू?
दिवस. वार .वेळ ठरला.

डिपॉझिटचा चेक आणि इतर ११ चेक ब्लॅंक दिले. घाईत नाव . रक्कम लिहली... रोख दहा हजार देताना म्हटले हे ९५०० हजार आहेत. पाचशे खर्च झाले.. उद्या देतो...
धक्का नंबर एक...
ठरले उद्या १०० रूपायंच्या स्टॅंपवर करार करण्याचे ..
स्टॅंप व्हेंडरकडे गेल्यावर त्यांनी सल्ला दिला..

हे तुमचे लिव्ह-लाय़सेन्स डॉक्यूमेट नोटरी कडे नोंदवून कायदेशीर होत नाही. त्यासाठी ते रितसर रजिस्टर केले तरच त्याला कायदेशीर आधार मिळेल. नाहितर.. साध्या १०० रुपयांच्या स्टॅंपवर करार करा. दोघ्यांच्या सह्य़ा घ्या. आणि साक्षिदाराच्या सहीने दोघांकडे द्या... मात्र त्यासाठी भाडकरूबद्दल विश्वास असणे..ते ११ महिन्यानी जागा खाली करतील याची खात्री मात्र हवी.
झाले मन डगमगले.
एवढी २० लाख किंमतीची जागा देणार... आपल्या लाभासाठी..
उद्या त्याने जागाच ताब्यात दिली नाही तर ?
आली का शंका...

मग एक दोघांना फोन केले. त्यांनी कशी जागा भाड्याने दिली आहे याची माहिती मिळविली. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन पैसे आत्ता गेले तरी चालतील पण भाडेकरुबरोबरचा करार रितसर रजिस्टर व्हायलाच हवा..
सौ.नीही मैत्रीणींना फोन लावले. त्यांचेही म्हणणे हेच पडले....
झाले...मी त्या तथाकथीत भाडकरूला फोन लावला. तो कार्यलयात असल्याने उचलला गेला नसावा. मग मध्यस्थ असलेल्या त्यांच्या बहिणीला फोन करुन सांगितले..
तुमचे पैसे...चेक मिळालेत...पण हा व्यवहार रितसर रजिस्टरकडे नोंद.होईल. त्याचा निम्मा खर्च तुम्हाला सोसावा लागेल. शिवाय पोलिसांचा भाडेकरूंनी भरायचा फॉर्मही भरून द्यावा लागेल.
त्यांच्या कडून आढेवेढे घतले गेले....आम्ही काय फालतू आहोत काय...वगैरे वगैरे...उत्तरे मिळाली...

मग मी ठरविले आता पैशाकडे पहायचे नाही सारे काही कायदेशीरच करायचे.

मध्यस्थालाही झाला प्रकार कानावर घातला.
दुस-या दिवशी भाडेकरूचा फोन आला.. त्याला विचारले
असा कायदेशीर करार करायचा आहे... खर्च तुम्हीही निम्मा करायचा आहे...
झाले... भाषा बदलली. तुमचा एवढा विश्वास नाही काय ?
वगैरे...

मग मी ठाम भूमिका घेऊन त्यांना सांगितले..की, मग व्यवहार इथेच भांबवूया.. तुमचे पैसे आणि चेक परत देतो....आज आत्ता..

अर्ध्यातासात पुन्हा घरी गेलो. भाडेकरू आणि बहिण थांबले होते.
काय तुम्ही ? अकरा महिन्यासाठी कशाला एवढे खर्चात पाडता ?
माझा मित्र वकील आहे. कमी खर्चात काम होईल?
मात्र मी मात्र पैसे-चेक देउन हा व्यवहार झाला तिथेच थांबविण्याचे ठरविले असल्याचे स्पष्ट केले.
त्यांना क्षमस्व म्हणून मी..परत फिरलो...पुन्हा कधी वळून न पाहण्य़ासाठी.....

आता परत भाडेकरूच्या शोधात आहे..
मात्र एक ठाम धोरण आखले.
की रितसर कायदेशिर करार करूनच जागा भाड्याने द्यायची.
हे लिहले आणि मन शांत झाले...

पाहू या कोण भाडेकरू मिळतोय?

कदाचित तुमच्यापैकीच कुणी तो असेलही....
पण खरेच फ्लॅट भाड्याने द्यायचाय बरका...
.


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276

No comments: