Sunday, July 31, 2011

मुलांना सुट्टीच्या दिवशीही डे केअरमध्ये ...


नोकरी, घर, मुले असे व्यग्र वेळापत्रक असलेल्या दिनक्रमातून स्वत:साठी वेळ हवा असणा-या आई-बाबांकडून आमच्या मुलांना सुट्टीच्या दिवशीही डे केअरमध्ये ठेऊ शकतो का, अशी विचारणा केली जात आहे. बाणेर, औंध, वाकड या भागांमधील विविध डे केअर सेंटरमध्ये अशी विचारणा करणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते आहे.

' आयटीमध्ये काम करणाऱ्या जोडप्यांना काही वेळेला शनिवार-रविवारी काम करावे लागते. अनेकदा व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांसोबत वेळ घालवणेही शक्य होत नाही. या कारणांनी मुलाला सुट्टीच्या दिवशी 'डे केअर'मध्ये ठेवण्याची सोय होऊ शकते का अशी विचारणा अनेक पालक करतात. वाढत्या मागणीमुळे आता आम्ही शनिवारी डे केअर सुरू ठेवले असले, तरी रविवारी मात्र बंदच आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाँग कॉन्फरन्स कॉल किंवा कॉर्पोरेट पार्टीला थांबता यावे यासाठी रात्री उशिरापर्यंत कंपनीमध्येच डे केअर सेंटर चालवणे शक्य होईल का अशी विचारणा केल्याची माहिती स्पार्कल्स डे केअर सेंटरच्या संचालिका मौतुषी सेनगुप्ता यांनी सांगितले.

बाणेर, औंध, हिंजवडी, वाकड या भागांमध्ये स्पार्कल, पम्पकिन डे केअर, लर्निंग ट्री, रॅबिट अँड टॉरटॉइज, रायझिंग स्टार, सॅपलिंग, इंदिरा किड्स इत्यादी डे केअर सेंटरर्स आहेत. बहुतांशी डे केअर शनिवारी चालू असतात. सर्वसाधारणपणे शनिवार-रविवार वगळून महिन्याकाठी प्रतिदिन आठ तासांसाठी सात हजार रुपये एका मुलासाठी आकारले जातात. मात्र, शनिवारसाठी वेगळा चार्ज आकारला जातो. रायझिंग स्टार डे केअर सेंटरच्या संचालिका शायनी नायर यांनी सांगितले, 'माझ्याकडे रविवारी डे केअर हवे आहे अशा क्वेरी कमी आल्या आहेत. मात्र यांची संख्या वाढली आणि स्टाफ उपलब्ध असेल तर रविवारीही डे केअर सुरू ठेवण्याची माझी तयारी आहे.'

अस्मिता चितळे ,
पुणेhttp://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9425445.cms

No comments: