Monday, September 5, 2011

पायवाटा गेल्या मागे


मित्रहो, एका विशिष्ठ वयानंतर कुणालाच कसलीच अपेक्षा नसते. हवी असते ती खरी मैत्रीची नाती..आणि शोधला जातो आपल्या माणसाच्या चार चांगल्या भावना....अशीच भावना घेऊन...मी माझ्या पत्नीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा ओंजळभर शब्दातून भावनांचे कवडसे..दिले..तेच तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे...

तिच्या मनातल्या कोंदणातून..


नव क्षितीजावर

पायवाटा गेल्या मागे..आज उजळली नवी झळाळी
पन्नाशीच्या लाटा अलगद..दिसू लागल्या नव क्षितीजावर
रंग नवा तो दिसे आता मज.. जीवनाच्या नव जाणीवांचा
उसळे मनही..धाव घेतसे..विसरती..झरती..माझे मीपण
संसाराच्या सारीपटावर..फडकू लागे..दोन तिलोत्तम
कधी निवारा..हवा सहारा..सारे भासे माझे मीपण
जीवन म्हणजे..सारीपाट..सोंगट्यांचा एकच ध्यास
चाकरी..भाकरी..निवारा...दमला..भासला..एकांतवास
भासातून..त्रासातून..विसाव्याच्या धुंदीतून
मनाच्या कोप-यातून..प्रेमाच्या ओलाव्यातून
गंधीत वा-यातून.. धुंद त्या श्वासातून..
गुंतलेल्या जाणीवातून..
वारे वहात होते.. काळ सरकत होता..
वर्ष कधी पुढे गेली आणि वय वाढत गेले
कळलेच नाही....
विसाव्याला तुम्ही होता..तरीही भरकट सुरूच होती
आज माझ्या देहातून..शरीराच्या पेशीतून..
संसाराच्या चौकटीतून.. डोकावताना पहाते आहे
माझे मलाच ते भासमय भासत आहे
---------------------------------------------------------------------------------

माझे थोडक्यात उत्तर..असे

सखी, तुझ्या वाटेवर आलो
तुझ्या चित्तात रमलो
तुझ्या सुखात न्हालो
बहरलो.. नादावलो..

तुला कष्टवित.. तुझ्या श्वासात
माझ्याच धुंदीत..विसरलो ..गेलो
तु पन्नाशीत शिरलीस..
आणि
भानावर आलो..तुला नाही दिले..
हवे ते बालपण
तुला नाही अनुभवता आले..
सारे मीपण..
आता मात्र निश्चिंत अस
विसावलेल्या माझ्यात..
भांबावू नकोस..
आता खरी ओढ
वाढत आहे..
दूरवर गेल्यावर
बिंदूच्या किरणातून
मी आता झिरपतो आहे..
तुझ्या संगतीने पुन्हा बहरतो आहे..

नको करू खंत
आहे ते खरे..
हेचि चित्ती उरे
तुझ्या नी माझ्या

वयाची ही किमया
दावी ती सहाया
आता विठुराया
ठेवी मज


subhash inamdar
9552596256
subhashinamdar@gmail.com

2 comments:

snapguru said...

अप्रतिम...सुभाष..जी...

DEEPA said...

khupach sundar. Kharokharich apratim. aamachya bhavanana shabd tumhi deta. thanks.