Sunday, September 11, 2011

खरचं हे सारे आपण का करतो....एक मुक्त चिंतन


आयुष्याच्या एका वाटेवर हा प्रश्न कदाचित मला आज पडला असेल...पण तुम्हालाही तो केव्हातरी पडला असेल ना...
खरं सांगा, आपण जगतो कुणासाठी...
खरा आनंद कुठे मिळतो...
समाजाबरोबर वावरत.. की वाहावत जातो..
स्वत्व उरत नाही... आपण आपले नसतो..कुणाच्यातरी तालावर नाचत असतो...कधी त्यांची मर्जी म्हणून तर कधी आपण काही गोष्टींबरोबर अंधानुकरण करत असतो म्हणून...
अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत.. ती शोधायचा आपण प्रयत्न करतो... सापडतात...छे ..छे ...तरीही दुसरे करतात म्हणून ती गोष्ट आपण करीत रहातो... का...कुणासाठी ..कुणाचे बंधन हे....
तुम्हाला वाटत असेल..याला काय करायचं आहे...
आपण जागतिकीकरणाच्या गोष्टी करतो..पण आपल्या घरात जे आपण करतो...ते का.... हे आपण सांगू शकतो काय....
तुम्ही देवाची पूजा करता...किंवा घरातल्या देवांना नमस्कार करता ना...
तो तुम्हाला काय देतो... आत्मविश्वास की निव्वळ श्रध्देपाटी...
खरं. सांगा,,, तुम्हाला देवाची आठवण होते तेव्हा तुम्हाला काही प्रश्न पडतात.. काही दुखतं. खुपतं...तेव्हाच ना...
तुमच्यातला तो दुबळा बनतो..मग तुम्ही तुमचे संकट दूर व्हावे म्हणून प्रयत्नाचाच एक भाग म्हणून देवाशी...किंवा देवापाशी नतमस्तक होता...
तुम्हाला लहानपणी भरवलं जातं.. देवाला नमस्कार कर. त्याच्याजवळ माग मला चांगली बुध्दी दे...मला मोठं करं...
हो ना....
तुमच्या एक लक्षात येते काय..तुम्ही माणसातल्या देवत्वावर म्हणजे तुमच्यावर विश्वास न ठेवता कुणीतरी आपल्या काही तरी देईल..मग आपले चांगले होईल..आलेले संकट दूर जाईल...आपण चिंतामुक्त होऊ.....
आजकालची पिढी हे सारेपासून दूर जातेय...
ती प्रॅक्टिकल बनत चालली आहे...ती अधिक विचार करून जगायला शिकली आहे..ती श्रध्दाळू आहे.. पण तिचा विश्वास आहे...स्वतःवर..आपल्यातल्या गुणांवर..
एक खरे जर त्यातूनही ते चुकले तर स्वतःची चूकही ते कबूल करायला मागे पुढे पहात नाहीत....
आता आपणही विचार केला पाहिजे जे करतो...ते का...याचा....
हे आपण का करतो याचा...पैसा आणि तुमचा आत्मविश्वास दोघेही एकत्र आले..तर उद्याची पहाट नक्कीच तुमची आहे.


सुभाष इनामदार,पुणे.
..९५५२५९६२७६...
subhashinamdar@gmail.com

No comments: