Sunday, September 18, 2011

अबतक छप्पन्न


आज एक खास दिवस... थोडे मागे वळून पाहताना. आपण काय मिळवलं. यापेक्षा काय गमावलं याचं भान टिपत होतो. आपले नाव व्हावे. जगाने किंवा परिवाराने नाव काढावे असे नव्हे..तर स्तः काही केले काय...याचा धांडोळा मी काढला..त्यातून शब्दांनी मला हे सांगितले..ते तुमच्यापर्यत दाखल करीत आहे....मुक्तछंदासारखे काही..

अबतक छप्पन्न

अपेक्षीत नसताना फारसे ...दिस जात होते...
केला होता विचार..पण साधला नाही व्यवहार
स्थैर्य म्हणतात ना..दोन वर्षापूर्वीच संपले
आता एक ना दोन...कैक कामी आले
रुळलेल्या मार्गावरून नव्हते मला जायचे
वेगळीच वाट शोधत..स्वतःचे पाऊल संथपणे
एकेक वळणावर..
तसे फारसे भेटले नाहीत
मीपणाने एकटा एकटा राहून..
दिशाहिन भरकटलो
स्थीरता कशाची..कशासाठी...बळ सारे केले
संसाराच्या रथाचे...दुसरे चाक फिरत राहिले
त्यानेच दिला आधार..सारा उचलला भार
जरा भडीमार.. केला विचार...करूनी साराचार
उभा अजुनी मी.. दोन मुलांच्या साथीने
विश्वास आहे खास ..नाव, लौकिक, धेय्य
तेच मिळवतील..घराण्याची गादी तेच चालवतील
साथ मोठी भक्कम....दोन वेळच्या भुकेची
नाही मारामार...
किती गेले..किती राहिले...कुणास ठावे
गेले ते दिन सुदिन होते
येणारेही आता तेही बेहत्तर असतील
फिकर किसकी...हो गई सालोसाल
अबतक छ्प्पन्न...


सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com

No comments: