Thursday, January 6, 2011

मटा संस्कृतीचा `स्मार्ट` उदयशुकवार पासून पुण्याच्या वृत्तपत्रसृष्टीत नवी मटा संस्कृती उदयाला आली आहे. तिचे अस्तित्व काही पारंपारिक पायंड्यांना कदाचित धोका निर्माण ठरू शकेल. याचे उत्तर काळच देईल. पण एक नक्की अशा नव्या रूपाची.. नव क्षितीजांची गरज पुण्याच्या वाढत्या शहराला नक्कीच होती. ती गरज महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीने ओळखली आहे.

तिचे रूप आकर्षित आहे.. तिचा चेहरा सुंदर मेकअप केलेल्या पुणेरी मुलीने अधुनिकतेचे पण साजेलशे रुप घेणा-या नवरूणीसारखे मोहक आहे. तिच्या मजकुरात नव्या तरूणाईचे पडसाद आहेत. तिला ज्यागोष्टी हव्याश्या वाटतात याचे सादरीकरण आहे....

मात्र परंपरेला जपणे ती वाढविणे आणि वृध्दिंगत करणेही तेवढेच महत्वाचे आहे..याची जाणीव या नव्या पारंपारिक वृत्तपत्रांच्या कचेरीतून काम करून समृध्द झालेल्या पत्रकारांनी जाणले असेलच...
काळाचा बोजा...आता दिवसेंदिवस वाढणारा आहे...तो न पेलणारा आहे.. नवी माध्यमे आपलेही काही ठसे तरूणाईवर कोरणार आहे...तीही काळाची गरज आहे.

आकर्षक छपाईच्या तंत्रांनी अनेक ठिकाणी होणा-या छोट्या समारंभाची दखल इथे घेतली गेली पाहिजे. सांस्कृतिक क्षेत्राचा परिपूर्ण विचार करता..

आज वाचकात तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित वर्ग आधिक आहे...जो आपल्या काही नवेपणाचे क्षेय सर्वापर्यंत जावे वाटणारा... ज्याला कलांच्या नवदालनात अजून अडखळल्यासारखे वाटते. ज्याला स्थानिकातही जागा हवी असते.. ज्याचे लक्ष सदाशिवपेठी पुणेरी माणसारखे चाणाक्ष असते....
`शीला की जवानी` बरोबरच त्याला विविध ठिकाणी घडणारे चांगल्या उपक्रमाला प्रसिध्दी हवी असते. त्याला त्या पारंपारिकतेचा ..तिथल्या मक्तेदारीचा....थोड्या आगावूपणाचा तिटकारा आहे...त्या सर्वांना ही नवी मटासंस्कृति कशी सामावून घेणार आहे ?

पुण्यात नवा `आदर्श` देताना ह्या आमच्या `स्मार्ट मित्रा`ला तमाशातला नाचा म्हणून मिरवायचे नाही तर त्याचे खरे सांस्कृतिक बळ सिध्द करायचे आहे..
आमच्यासारखे असंख्य मित्र साथीला आहेतच..पण त्याला नवेपणाचा भपका आणताना परंपरेला धरून प्रसंगी त्याची संस्कृतिक मूल्ये वाढवायची आहेत.
खात्रीने तो ती पूर्ण करेल आणि असंख्य वाचकांच्या घरात केवळ अकरा रूपयात चार महिने दिसणारा हा.. हा.. मित्र आपली खरी गरज भागवून तुमच्या घरचाच सखा बनेल.. तो बनावा हिच सदिच्छा.

आपला मटाप्रेमी,
सुभाष इनामदार, पुणे9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com

Tuesday, January 4, 2011

गोनीदांचे शब्दशिल्प- नाबाद पाचशेती `पडघवली` ..काल श्रोत्यांच्या मनात पुन्हा जागी झाली...त्यांनी त्यातली अंबा, म्हादू, व्यंकू आणि आक्काने आत्महत्या केलेला प्रसंग...सारेच पुण्यातल्या सुदर्शन रंगमंचावर अवतरले ते डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव आणि रूचिर कुलकर्णी या तीन्ही कलाकारांकडून...तेही अभिवाचनाच्या रूपाने.

निमित्त ते या अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे ५०० व्या प्रयोगाचे...सुदर्शनचे छोटेखानी रंगदालन फूलूनच नव्हे तर उभे राहणाही कठीण झालेले. आजपर्यत या अभिवाचनाला दाद देणा-यांचे आभार मानून पडघवलीतले..एकेक पात्र कादंबरीतून मंचावर अवतरत होते. गो.नी.दांडेकरांच्या लेखणीतून झिरपणारे ते शब्द संकलीत करून डॉ. वीणा देवांनी ते अभिवाचन एक तास चीळीस मिनीटांवर आणले. हा वेळ म्हणजे पडघवलीत मनस्वी हिंडण्याचा. व्यक्तिरेखेच्या एकेक प्रसंगानुरूप कधी बांधावर..तर कधी मामंजीच्या पडवीवर..तर कधी बंदरावर...
तीनही कलावंतींनी अभिवाचनाचा जो आदर्श पायंडा पाडून दिला आहे.. त्य़ातून शब्दातून कलाकृती किती समर्थपणे वाचकांसमोर उभी राहू शकते याचे ते उदाहरणच आहे. कादंबरीचा संक्षेप करूनही पडघवलीतील गुढरम्य वातावरण.. स्त्रीयांच्या स्वभातले कागोरे..ते कोकणातले विविध स्वभावांचे नमुने..त्याही पेक्षा..कोकण सोडून मुंबईकडे गेलेल्या माणसांनी या निसर्गाला कसे ठोकारले तेही साद्यंत स्षष्ट होते.
कधी लहान मुलगी..तर कधी सून..तीही मोठी आणि धाकटी..मामंजी..छोट्या रंग्या..म्हाहदू...नवरा..तर व्यंकू आणि त्यांचा कावेबाज डाव...सारेच उलगडत राहिले. निसर्गाने मानवाला दिलेले हे वरदान काळाच्या पडद्याआड जात आहे....

ते वाचवा... पाणी अमूल्य आहे..ते सांभाळा... गावातली सारी घरे म्हणजे एक कुटुंब ते विस्कटू देउ नका... माणसांच्या स्वभावातले दोष न घेता गुण घ्या ...एक ना दोन...अनेक निरीक्षणे गोनीदांच्या या पडघवलीच्या वाचनवातन बाहेर आली आहेत.
ती काढण्याचे सामर्थ्य ह्या निमित्ताने या आभीरूप वाचनातून बाहेर आले. ४ ते ६ जानेवारी २०१० ह्या तीन दिवशी पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा आणि जैत रे जैत अशा कादंबरीला त्रिपदीतील वाचनाचून साकारून हा एक शब्दयज्ञाचा जागर मांडला आहे. वडीलांच्या कलाकृतीचे जागरण तर यातून होईलच पण कांही समाजाला बोधही मिळेल.
महाराष्ट्रात, परप्रांतात अनेक व्याख्यानमालेत..कधी गडावर तर कधी गडाच्या पायथ्याशी ही अभिवाचनाची भ्रमणयात्रा झाली. शब्दाला साद घातली गेली.
यातून उभे राहिले ते दुर्गप्रमी. त्यांनी किल्ले पुन्हा जागृत केले. त्यातला इतिहास जिवंत केला. मावळ्यांप्रमाणे या किल्ल्यांवर हर हर महादेवचा गजर झाला. गोनीदांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
अभिवाचनाने तृप्त झालेला रसिक त्यांच्या सीडीही घरी घेउन त्यांची पारायणे करत आहे. अशा नादमयी आणि संवादातून तर कधी निवेदनातून फुलणा-या या अभिवाचनाच्या सेतूला एकहजाराचीही पट्टी न लावता..ते लक्षावधी कार्यक्रमातून मराठी मुलाखाला साद घालत हजारो वर्ष होत राहोत..हिच सदिच्छा.सुभाष इनामदार,पुणे

Subhashinamdar@gmail.com
Mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.cpm
www.cluturalpune.blogspot.com

Sunday, January 2, 2011

स्वप्नऋतु सीडीतून तरूणाईची गाणी
स्वप्न... हेमंतातल्या गारव्यासारखी ...
गोड आल्हाददायक स्वप्न ....
चांदराती सरून गेल्यावर ....
पहाटेला गुलाबी रंग देणारी ..
ही स्वप्न
अशी हळवी, मोहक स्वप्नांची गीते देणारी स्वप्नऋतु
स्वप्ने सगळेच पाहतात. ती खरी करण्यासाठी आयुष्य वेचतात.
या स्वप्नाऋतु या श्रीरंग उ-हेकरया तरूण संगीतकाराने केलेल्या आठ गाण्यांची सीडी पुण्यात रविवारी २ जानेवारीला संगीतकार आनंद मोडक यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आली. तसा पुण्याचा असला तरी सध्या हैद्राबाद इथं नोकरीनिमित्त गेलेल्या हर्षल पाटील याच्या गीतांना या सीडीत बंदिस्त करण्यात आले आहे. ऋचा घाणेकर – थत्ते हिच्या परिराणीच्या गीताने ह्या सीडीतून तुम्ही थोडे लहानही बनाल.

संगीताच्या ह्या दुनियेत नव्याने उदयाला येणा-या या संगीतकाराच्या कामाचे कौतूक करताना त्याने केलेल्या गीतांचेही आनंद मोडक यांनी कौतुक केले आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निखील श्रीराव यांनी या सीडीची निर्मिती केली आहे. त्यांच्या रूपाने मराठी शब्दांवर प्रेमकरणारा आय टीतला एक तरूण पुढे आला याचा अधिक आनंद होतो. या मराठी अल्बमच्या निमित्ताने अनेक नवे कलावंत संगीताच्या क्षेत्रात दिसायला लागतात. यात संगीतकार श्रीरंग उ-हेकर हा संगीतकार. गीते लिहिणारे हर्षल पाटील आणि ऋचा घाणेकर-थत्ते. अभिषेक मारोटकर हा गायक.
तसे या स्वप्नऋतुत दोन गीतांना सुरेश वाडकरांसारखा गायक-कलावंत सामिल झाल्यानेही या नविन मंडळींना हुरूप येणार आहे. या शिवाय सारेगमप मधले दोन चेहरे ऐकता येतात एक आनंदी जोशी आणि मुग्धा वैशंपायन हे गायक.
सर्वांनीच तयार केलेला हा मराठी अल्बम मनसा या कमलेश भडकमकरांच्या संस्थेने वितरीत करण्यासाठी घेतला आहे. यातच त्याचे मह्त्व पटून जाते.
या निमित्ताने अमर ओक यांच्या बासरीवादनाची छोटेखानी मैफल रंगली. त्यांनी बासरीतून घेतलेल्या आगळ्या सुरावटींनी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत आखणी वाढ झाली. त्यांनी पोकळ बांबूच्या बासरीमधून श्रीकृष्णाने हाती धरलेल्या मुरलीची कमाल तेवढ्याच ताकदीने दाखवून बासरीवरचे नाद ह्दयात साठविण्याची संधी दिली.
आनंद मोडक यांनी सकाळच्या जाहिरातीत कांही गोष्टींचा उल्लेख केला तर दर जास्त लागतो याची खंत व्यक्त केली. ध्वनिफितीचे प्रकाशन म्हटले की ती कमर्शीअल जाहिरात होते. म्हणूनच अमर बन्सीच्या जाहिरातीतून सहभागी गायकांची नावं टाकून जाहिरात दिली आणि हा समारंभ त्याचाच एक भाग म्हणून करावा लागला यांची खंत स्पषटपणे जाणवली.

स्वरांचे सूरेल नाते ते बासरीच्या सूरातून. गायकांच्या मुखातून आणि गीतांच्या बोलातून येत होते आणि ते रसिक चाहता आनंद घेत आस्वाद घेत होता...हेच महत्वाचे नाही काय ?
तुम्हीही हा नवा मराठी गाण्यांचा...मनातल्या भावनांचा...अधु-या स्वप्नांना साकार करणारा....जरूर ऐकावा हिच इच्छा आहे....

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276
www.subhashinamdar.blogspot.com
www.cluturalpune.blogspot.com