Thursday, January 19, 2012

उच्चारापेक्षा कृतीला महत्व..



रोज अनेक गोष्टी आपण सारेच बोलतो. ठरवितो..पण त्या जर प्रत्यक्षात येत नसल्या तर त्या वायफळ, बाष्कळ, निरर्थक ठरतात.
म्हणूनच कमी बोलून कृती अधीक करण्याची संकल्पना प्रत्येकाने स्वतःमध्ये ठसवून घ्यायला हवी.
क्रियेविणे वाचाळता व्यर्थ आहे..
समर्थांच्या या श्र्लोकाच्या दिव्यतून प्रत्यकालाचे जावे लागते. अनेक संकल्पना मनात येतात...तक्षणी त्या कुणाजवळ बोलल्याही जातात...पण त्या सत्त्यात येण्यासाठी फार कष्ट..फार मोठे मोल द्यावे लागते...
म्हणूनच बोलण्यापूर्वी विचार
वाचारापूर्वी आचार..
ही सर्वात महत्वाची बाब आहे.
बोले तैसा चाले....
खरयं अगदी..
बोलणे सोपे..
पण कृती तेवढीच अवघड... आणि अशक्य....
पहा पत्यक्ष आपण सारेच हा प्रयत्व..नव्हे संकल्प करू यात...



सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: