Sunday, January 29, 2012

स्वरांचा नवसाक्षात्कार
स्वरांना आळवत जेव्हा तू गात असतेस
आणि निर्माण करतेस नवे सूर....
त्या वातावरणात ते मी अनुभवू लागतो
तेव्हा तू अधिक मनमोहक दिसतेस...
तु तुझी राहिलेली नसतेस...
तु होतेस त्याची...ज्या विधात्याची
त्याच्याच आज्ञेने तू नवे सूर निर्माण करतेस...

नेहमीची आवरणे..चिता...काळजी..
सारेच मग कसे दूर सारतेस
उरतेस ती सूरांची निर्मिती करणारी एक कलावंत...

मला त्या स्वरांचे असणे नेहमीच आनंद ..
नव्हे.. मीही माझा उरत नाही..असे काहीसे...
गातानाचा लडीवाळपणा...सूरांबरोबर लयीशी खेळणे..
सारेच पाहून ..साठवून ठेवण्याचा प्रयत्न होतो..

पण पुन्हा आटवायला गेलो..ते क्षण नाहीसे होतात..
काहीच न घडल्यासारखे...अस्पष्ट
पुन्हा नव्या मैफलीचे आश्वासक सूर अनुभवयाला मिळतील..
खात्री आहे मला..
तेव्हही मला तूझ्या नव्या स्वरांचा नवसाक्षात्कार होईंल...subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

No comments: