Sunday, January 29, 2012

येणा-या पहाटेला नमस्कार....पण सावधगिरीने`...


शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात ग्रेस बोलत होते

शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात `येणा-या पहाटेला नमस्कार....पण सावधगिरीने`...
असे सांगतच ख्यातनाम कवी ग्रेस यांनी...दुस-या ई-साहित्यसंमेलनातील भाषण सुरू केले....सा-यांचे कान टवकारुन ते काय म्हणतात याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष होते....अगदी त्यांच्या बाजूला बसलेले युनिक फिचर्सचे सुहास कुलकर्णी काय किंवा.. अगदी कडेला आपल्या डोळ्यातून आणि कवी ग्रेस यांच्या चेह-यावरचे भाव आणि शब्द टिपण्यासाठी उत्सुक असलेले संजय भास्कर जोशी काय.....
तुम्ही सा-यांनी दुर्बोध म्हणून जाहिरच करुन टाकल्याचा उल्लेख त्यांच्या तोंडून आला...पण मला काही फारसे वाटत नाही...आपण या जगात जगतो...मात्र मी माझ्याशी एकांतात रहातो...फारसा या जगात मी नसतो...मी माझ्यातच ..स्वतःच्या धुंदीत आत्ममग्न असल्याचे ते सांगतात...
आता तर मला..रोज मूठभर गोळ्या एकदम खाव्या लागतात..एकेक करुन त्या मला घेताच येत नाहीत...तसा मी लहान मूलासारखा एकदम गीळतो...
बालमुठीत इवल्या
कापून आणली माया...
सांगत ते पुन्हा त्यांच्यात आत मनाच्या गाभा-यातून बोलत जातात..
ते ऐकायला फारच छान वाटते..पण संदर्भ सतत बदलत ते सतत आतल्या आवाजातून नवे घुमारे घऊन बोलत जातात...
तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने जावू लागले ते तुम्हाला खलास केल्याशिवाय रहाणार नाही....असा इशाराही ते देतात....
आधिच्या वक्त्यांनी आजच्या काळातील मानवी बुध्दीच्या पलीकडे संगणकीय प्रगत ज्ञान विस्फोटाच्या मार्गावर आहे..पण...माणसाच्या बुध्दीची ते नक्कल करु शकणार नाहीत...म्हणून तर ते आता ज्ञानला पूरक अशी नवी प्रणाली शोधण्याच्या मागे आहेत....
कवी ग्रेस...या प्रगती बद्दल मोजके पण नेमके बोलले...आत्मचिंतनाच्या स्थितीत..आणि वेदनेचा ध्यास उलगडून सांगताना...मला असह्य वेदना होतात..तेव्हा मला इंजेक्शन देऊन टाकतात...मी तेव्हाही माझ्या आत बोलत असतो...असे भावतालची मंडळी सागतात...
उच्छादावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे...पण आयुष्यातला एकही कण वाया जावू देणार नाही असी प्रतिज्ञाही ते इथे घेतात...
या निमित्ताने या आत्मचिंतीत आणि मनस्वी कवीच्या मनात नेमके काय दडलेले आहे..ते सांगणे कठीण जाते...म्हणूनच कदाचित ते दुर्बोध वाटत असावेत...




सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276

ई- साहित्य संमेलन


' मी आरसा आहे, पण प्रतिमा नाही, पूर्ण ग्रेस अजून माझा मलाच उमगलेला नाही,' असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी ग्रेस यांनी शनिवारी केले. युनिक फीचर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

दुसऱ्या ई- साहित्य संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र नॉलेज कॉपोर्रेशनचे एमडी विवेक सावंत यांच्या हस्ते झाले,
'मी जन्मजात बालक आहे, पण त्यामध्येही एक प्राचीन पुरुष मी लपविला आहे. माझ्यातील मुलाला उत्साह सांडायचा नाही, त्याप्रमाणेच प्राचीन पुरुषाला उच्छादही मांडायचा नाही,' असे ग्रेस म्हणाले. प्रौढत्वी निज शैशवास जपणेे, या केशवसुतांच्या ओळी मी रोज अनुभवतो आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या तंत्रज्ञानामुळे सर्वकाही मिळविणे शक्य झाले आहे. पण, तंत्रज्ञान चुकीच्या मार्गाने गेले, तर माणुसकीला खलास केल्याशिवाय राहणार नाही, असेही ग्रेस यांनी नमूद केले.

No comments: