Friday, March 2, 2012

कार्यक्रमाचे आयोजन सांगली व कोल्हापूर येथे

सांस्कृतिक पुणे
मित्रहो नमस्कार,
दुर्गम भागीतील आदिवासींच्या आरोग्यासह सर्वांगीण विकासासाठी झटणा-या डॉ,
मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील `लोकबिरादरी
प्रकल्पास` जास्तीत जास्त मदत मिळवून देण्य़ासाठी पुण्याच्या
व्हायोलिनवादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलिन गाते
तेव्हा...` या कार्यक्रमाचे आयोजन सांगली व कोल्हापूर येथे करावयाचे आहे ``सांस्कृतिक
पुणे ` च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमातून जमा होणारी सर्व रक्कम (खर्च वजा जाता) यांच्या
`लोकबिरादरी प्रकल्पास` देण्यात येणार आहे.
आपल्यासारख्या जाणकारांचा आणि संस्थां व व्यक्तींचा
आर्थिक मदतीचा हात त्यासाठी मागत आहोत.
ज्यातून स्व. बाबा आमटे यांनी लावलेले रोप वृक्ष स्वरुपात उभे करायचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे
डॉ. मंदा व प्रकाश आमटे व आमटे कुटुंबीयांच्या कार्याला हातभार लागणार आहे.
आपल्या सारख्या मान्यवरांकडून याला खचितच उत्तम प्रतिसाद मिळेल अशी खात्री बाळगून इथेच विराम घेतो.

आपला.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: