Tuesday, March 6, 2012

निसर्गातले रंग


निसर्गाच्या रंगांची उधळण
झाली किती इथ आता..
कुठला रंग कधी खेळी
ठरणार ना एका अवधी..

वेली,फुलांनी डौलदार
बहार आणला
त्यांच्या रंग-रुपांनी
आकार जीवना आला...

प्रत्येक झाड रंगातच सामोरे
कधी एकसारखे
तर कधी वेगळेच भासते..
भूलून जाया काया ती सहज होते
सततचे सन्नीध रहावे जरुर असे वाटते....

निसर्गातले रंग बरेच काही देउन जातात..
तुमचे-आमचे कृत्रिम रंग कधी ओरखडा काढतात..
सारे ठरवून सोडूया हा घात
गाऊया निसर्गाचा रंगीत आलाप..सुभाष इनामदार,पुणे

No comments: