Saturday, March 10, 2012

माझ्या सातारी बोलीत...

माझ्या सातारी बोलीत
आहे तोरा, थोडा नखरा
परि प्रामाणिकतेचा
त्यात भागही आगळा !

थोडे टोचून बोलतो
थोडे बोचरे बोलतो
नाही त्यात अंशाचाही असत्याचा भास
अंतरीच्या निर्मळतेचे झरे तिथे खास!

कधी बोलतो आखीव
कधी केवळ बोलणे
थांबायाचे तेव्हा भानही नसणे
गती तोडायाची कशी
नसे ठाउकी कोणाला
त्याच्या मनातील भावनेला
आता कुणी जरा आवरा...

कधी भावनांचे स्वप्न
स्वप्नातही भास
चालता-बोलता
धरीतो स्वप्नांची कास!

नाते नाही कधी तुटायाचे
कधी विरणार नाही ते,
थोडा थांबला शिणला
होत नाद मधू तेथे!

नको कधी दूर जाऊ
बोलण्याने आजवरी,
दुरावा नाही उरी
शोध भरारीही भारी!

रांगड्या भाषेचा नाद मी आळवितो
भासलेल्या भावनांचा वेध मी सांधतो!सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: