Wednesday, March 14, 2012

एका वेदनेला फुंकर


आज मी प्रतिमेहुनही अधिक सुंदर चेहरा अनुभवला
त्याला खूप बोलायचे होते..पण आज तो अबोल होता..
त्याचे डोळेच सारे काही सांगत होते..
त्याला आज माझीही ओढ दिसत होती
मात्र संधी तशी प्रत्यक्षात नाही मिळाली..

एका वेदनेला फुंकर घालण्यासाठी माझे मन आतुर झालेले..
पण आज ती वेळ केवळ शब्दांनी होत होती...

सारी देहबोलीतून ती बोलत होती..
सांगत होती मला खूप काही सांगायचयं..

कितीतरी अशा महिला असतील समाजात
ज्यांच्या मानेवर आणि शरीरावर एक भला मोठा वजनी काटा ठेवलाय...
तो उचलून दूर करण्याचे सामर्थ्य ...आहे कुणापाशी...


त्या खचल्या आहेत...रोजच्या जगण्याला ..त्याच त्या वेदनेला झेलत.
त्यांची मनही बोथट बनली आहे..

जागतिक महिला दिन...झाला ना परवा..
तो कोणासाठी..कोणत्या त्या महिलांसाठी..की..फक्त ते नाव..लेबल ..



सुभाष इनामदार,पुणे.

No comments: