Friday, April 20, 2012

मसाला...पाहण्यात मौज वाटते


मसाला...अनुभवताना
उमेश कुलकर्णी यांनी लिहलेल्या संवादातून खुलत आणि घडत जाणारा आरभाट निर्मित मसाला पाहताना प्रथम फार वेगळेपणाने मांडलेली कथा पडद्यावर मोहविणारी होती...तिथे संघर्ष होता. धडपड होती. व्यवसायासाठी लागणारी धोरणे होती...पण ती पळपुटी होती. प्रत्येक व्यवसायात त्याला खोट येते आणि ततो दुस-या गावाला पळून वेगळा धंदा करतो...
नशीब बलवत्तर असलवे म्हणजे मेहता शेठ त्याच्यातल्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेऊन पोलिस चौकितून आपल्या गोडावूनमध्ये आणतात. अखेरीस तो टच मसालाच्या कारखान्याचा मालक बनतो.

एकूणच मसाल्याशी या ना त्या नात्याने संबंधीत चित्रपट.
उमेश,गिरीश णि दिग्दर्शनाची जबाबदारी खाद्यावर घेतलेला संदेश कुलकर्णी यांनी तयार केलेली कथा-पटकथा आणि प्रत्यक्ष चित्रपट किमान अनुभवाच्या क्लुप्त्या दाखविणारे आहे.

पहिली सुरवात होताना आणि मध्यंतरापर्य़त वाटले की प्रवीण मसालेवाल्यांचा तसा संबंध नसावा..पण मध्येतरानंतर सारेच सूत्र फिरतो ते मसाल्या भोवती..तिथे ती मजा संपते..राहतो तो एक उपचार.



भूमिकात सर्वात लक्षात राहतात ते दिलीप प्रभावळकर..संशोधकाच्या वेगळ्या जगात त्यांनी उत्तम कस दाखविला आहे. डॉक्टर लागूंचे दर्शन सुखद आहे. मोहन आगाशे खानदारी मेहता म्हणून छान वावरले..सफाई तर होतीच पण त्यात आश्वासकता होती.
गिरीश कुलकर्णी ग्रामीण ठसक्याची मजा संवादात आणतात..मात्र त्यात मला अमृता सुभाष थोडी कमी वाटली..तिच्या भावना पाहोचल्या पण बाज थोडी शहरीकडे झुकणार वाटला.. अभिनयातील सहजता हे त्यांचे वेगळे वैशिष्ठ्य. आळशी आणि थोडी विनोदाची बाजू सांभाळणारी भूमिका ऋषिकेश जोशीकडून पहायला मिळते..ती मजा आणि गंभीरपण बनवते.
एका नव्या टच मसाल्याची भर पडली एवढेच..

फार अपेक्षा घेऊन बघू नका..पण टेकिंग आणि विविध शहरांमधे हिडणारी ही कथा अनेक लोकेशन्सवर घडतात..ती पाहण्यात मौज वाटते.



(हे व्यकितशः निरीक्षण आहे.माझे पहिले ताजे मत एवढेच)
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: