Monday, April 23, 2012

प्राजक्ताची ओंजळ


प्राजक्ताची ओंजळ घेऊन तुला द्यायला आलोय
बघ ते सारे विसरलेले पुन्हा साठवायला आलोय

किती वेळा किती आणा-भाका, शपथा गंधातुन ओथंबल्या
भावना त्या वेळेच्या शोधताही, गहिवरल्या..थिजल्या

आता पुन्हा आणू कसे ते दिवस गेल्यावरी
जाता जाता एक मागणे..मिटून घेतल्यावरी..

विश्व अवघे अखंड राहे..प्राण माझीया तुझ्या मनी
एकदाच गुंतून पडला..आहे का ते ध्यानीमनी...

आज प्रार्थना तुला कराया आलो तुज दारी
घे आता चुकल्या तेही..ठेव सांभाळ मजवरी

एक सांगतो ऐक जराशी नको जावू दूर देशी
हेच मागणे आज कराया ओंजळ व्हावू कशी..


सुभाष इनामदार, पुणे

No comments: