Monday, May 7, 2012

गप्पांची सुरेल सांगता आनंद भाटेच्या भैरवीतूनरविवारची संध्याकाळ डिएसके गप्पांनी रंगत गेली ती एक संगीतकार आणि एक गायक अशा दोन कलाकालाच्या आविष्कारानी. योगायोग म्हणजे आजच बालगंधर्व चित्रपट प्रकाशित होऊन वर्ष झाले आणि दुसरे म्हणडे बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्य़ानंतर आनंद भाटेचा पहिला जाहिर कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले.
गप्पांची आजची सुरवात झाली ती शाकुंतल नाटकातल्या पंचतुंड नर रुंडमालधर या बालगंधर्व चित्रपटातल्या नांदीने अर्थातच ती सादर केली आनंद भाटे आणि गप्पांचा समारोपही झाला तोही बालगंधर्व चित्रपटातल्या भैरवीने. चिन्मया सकल ह्दयानी....


सुरेल कार्यक्रमात नव्या दिशेने रचनांकडे किंवा कवितेकडे पहाणारा एक तरुण संगीतकार कौशल इनामदार यांच्या मनमोकळ्या उत्तरानी. त्यांच्या दृष्टीने मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतोय..आणि मी स्वतःची अशी वाट निवडली आहे.. मला माझ्या गुणदोषांसह स्विकारा.. आज आपण जुन्यातले जे उत्तम ते आज लोक विसरत चाललेत...आणि संगीतात स्वतःची वेगळी वाट निवडली आहे... जुन्या संगीताकडेही नव्याने पाहण्याची माझी सवय आहे..म्हणूनच मी पुलंच्या भिल्लण या सांगितिक कार्यक्रमाला नवा टच दिला. आचार्य़ अत्रे यांच्या झेंडूच्या फुलाकडे वेगळ्या नजरेने पाहिले..आणि बालगंधर्व चित्रपटातल्या गाण्यांकडेही स्वतःचा पारंपारिक तरीही जुने जपण्याचा प्रयत्न केला आहे..

कौशल इनामदारच्या मते आनंद भाटेला गळा आहे..आणि आपल्याला नरडं आहे. आपण गायक नाही...फक्त कसे पाहिजे ते दाखविणारा संगीतकार मात्र आहे..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या मराठी अभिमान गीताचा संगीतकार म्हणून झालेला प्रवासही त्यांनी ऐकवला...रसिकांनी त्याला टाळ्यांनी दाद दिलीच आणि त्याने गायलेल्या गाण्यांनाही तेवढीच पसंतीचा पावती दिली.
गप्पांचा हा फड हलता आणि सुरेल संवादातून जिंकला तो आनंद गंधर्व आनंद भाटे यांने. एम टेक होऊन झेन्सर मध्ये चाकरी करुन तेवढ्याच ताकदीने शास्त्रीय. संगीताचा रियाज करणारा हा तरुण गायक नट अधिक लोकप्रिय ठरला तो बालगंधर्व चित्रपटातल्या नाट्यपदांमुळे...भारतरत्न पं., भिमसोन जोशी यांचेकडे २० वर्षे शिकून शास्त्रीय संगीताचा पाय भक्कम केला आणि त्यांचे ऋण आनंदाने मिरव तोही आता तेवढाच संतवाणी गाण्यात तयार असल्याचे त्याने कान्होबा तुझी घोंगडा चांगली यातून सिध्द करुन दिले. रागसंगीताबरोबरच भीमसेन जोशी यांचेकडे मैफलीत कसे गावे ते शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

संगीताची ही मेजवानी खुलविण्यात ज्या साथीदार कलावंताचा प्रत्यक्ष सहभाग होता त्यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा व आवश्यक आहे. हार्मोनियमची साथ करत होते बालगंधर्व चित्रपटाचे सहाय्यक संगीतकार असलेले आणि कौशल इनामदारांचे महाविद्यालयापासूनचे मित्र असलेले आदित्य ओक. तबला संगत केली ती पुण्याचे अनुभवी तबलावादक संजय करंदीकर यांनी ...तर माऊली टाकळकर.ज्यांच्या टाळाशिवाय संतवाणी होणार नाही,असे ज्येष्ठ बुजुर्ग कलावंत.

गप्पाची मैफल गतीमान केली ती राजेश दामले यांच्या सूत्रातून आणि प्रश्नातून..विविध ट्प्पायंवरचा प्रवास दोन कलावंताकडून त्यांनी उलगडून दाखविला.. त्यात रसिकाची उत्सुकता होती आणि संवादची साखळी होती.

डीएसके फाउंडेशनचे ट्रस्टी श्याम भुर्के यांनी गप्पांची आघाडीची बाजू सांभाळत याचा उद्देश स्पष्ट केला. मॅजेजिस्टि गप्पा बंद झाल्या आणि साहित्यिक गप्पांची उणीव जाणवली. चार दिवस का होईंना..कला, साहित्यिक आणि संगीत आणि राजकारणाचा फड डीएस के गप्पात रंगू लागला..त्याला आता १५ वर्षे झाली...आज त्याची सांगता आनंद भाटेच्या भैरवीनी झाली आणि पुढच्या वर्षीच्या गप्पांसाठी वाट पहाताना नव्याचे वेध होते..सुभाष इनामदार, पुणे

No comments: