Sunday, June 17, 2012

माझे वडील




हाफ खाकी पॅन्ट आणि वर पांढरा शर्ट अशा साध्या पोशाखात माझे वडील पिठाच्या गिरणीत जायचे. त्यांचा तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. आपल्या मुलांना दोन वेळची भ्रांत पडू नयो म्हणून ते नियमाने सकाळी चार तास आणि दुपारी चाक तास गिरणी चालवायचे. मिळकत फार नव्हती..पण आलेल्या पैशातून घराची किरकोळ खर्चाची हातमिळवणी व्हायची...

पुढे पुढे..गिरणीतली कमाई कमी झाली..गिरणी विकून टाकली..वडील घरी सातरच्या भावे सुपारीवाल्यांच्या पुड्य़ा भरण्याचे काम करायचे...

वय वाढले तसे ते थकले...काम होईनासे झाले..पण कधीही चेह-यावरचा आनंदी भाव कमी झाला नाही...जे मिळेल ते आनंदाने ...समाधानाने झेलायचे...

पुढे त्यांच्या ओषधांचा खर्च अधिक व्हायला लागला.. आणि आपण तर काही मिळवित नाही याची खंत त्यांना सतत बोचायची... पण वडिलांच्या चेह-यावरचे समाधान विरघळले नाही...अखेर पर्यंत..


यातून एकच शिकलो..कामाला मागे हटायचे नाही..
आहे या परिस्थितीत समाधाननाने रहायचे....आज ते नाहीत...

पण तिच माझा पुंजी आहे....

ही एक ओळख करुन द्यायला आवडेल..
पण ते आता सारे कुठे लिहता येते...
जे मनात दाटते ते तिथेच गाठते...
मागे केवळ स्मृतीच..
त्याच त्या घेऊन..जीवनाची पुढील दिशा होत आहे.

No comments: