Tuesday, June 19, 2012

पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...आपल्या आयुष्यातली कसरत सतत चालू असते. जेव्हा पगार कमी होते तेव्हा आपोआपच खर्च बेतासबात होता. पण जेव्हा मध्यमवर्गीय म्हणून आपण गणले जातो, तेव्हा एकेक व्यसने लागतात. आणि ती एकदा लागली की सुटत नाही...ही व्यसने तसली नाही...

घरात वीज नव्हती तेव्हा इतरांचा हेवा वाटायचा...पण आज घरोघरी वीज आली..मग वीजेवरची उपकरणे आली. टी.व्ही. फ्रीज, वॉशिंग मशीन, संगणक, मोबाईल, फोन.... पुढे या सगळ्याची इतकी सवय झाली की वीज पाच मिनीटे गायब झाली तरी बेचैन व्हायला होते. मग त्यासाठी इनव्हर्टर आला. चोवीस तीस वीज...

तीच गोष्ट घराची. भाड्य़ाच्या घराची घरमालकाची कटकट नको म्हणून स्वतःचा फ्लॅट आला. आता त्यासाठी कर्ज आले. ते फेडायचे म्हणून घरातल्या सर्वांनी नोकरी करायची..

बाहेर जायचे मग स्वतःचे दुचाकी वाहन हवे.... बस वगैरे...छे छे...नको रे बाबा! आता पेट्रोल...दर विचारु नका..८० रु. लिटर...

पूर्वी आंबा रायवळ..गावरान चालायचा..आता लागतो हापूस..तोही रत्नागिरी बरं.. आता मग तो रत्नागीरी समजून आपल्या गळ्यात व्यापा-याने मारल्यावर दोष कुणाला?

परिस्थितीमुळे खाण्याची आबाळ..आता..सतत..जे हवे ते..मिळते.. ते ही केव्हाही ,,कुठोही खात येते...मालिका पाहतानाच खाणे ही तर सवय...मग मालिकेकडे लक्ष..खाणे चाऊन खाणे.दूर..मग पोटाच्या तक्रारी सुरु...
लवकर निजे..लवकर उठे..तया आरोग्य संपत्ती भेटे.... आता कुठे..उशीरा झोपे..सावकाश उठे.... सर्रास सुरु.. पित्त, पोटाच्या तक्रारी..सारे आले...

डॉक्टर आले...पण ते आता मल्टीस्टोरेज हॉस्पिटल मध्ये...फॅमिली डॉक्टर..कमी झाले. त्याचा खर्च वाढला...
पैसा आहे..पण स्वास्थ्य हरवले...असे जीवन झाले आहे...सारे जण पळताहेत...रस्त्यावर जाताना अपघात झाला तरी त्याकडे डोळेझाक करुन आपली गाडी ऑफिस पकडण्यासाठी धावतोय..

असे जीवन..अशी सवय.... अनेक सांगता येईल..पण इथे थांबणे योग्य!( खरं तर हे सारे मी अनुभवतो आहे..तेच नोंदविले...ही तशी व्यक्तिशः नोंद आहे इतकेच...सगळेच यात सहमत रहातील असे नाही...)सुभाष इनामदार, पुणे.

No comments: