Wednesday, July 18, 2012

बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला

हिंदी चित्रपटसृष्टीतला खरा सुपर स्टार आज काळाच्या पडद्याआड झाला. त्यांच्या चित्रपटांनी आनंद तर दिलाच पण एक बहारदार अभिनयाचा अस्सल कलावंत हरपला.

आजच्या तरुण पिढीलाही त्या नावाचे आकर्षण होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या कर्तृत्वाने बॉक्स ऑफिसवर हाउस्फुल्ल चा बोर्ड झळकवणारा खरा कलाकार हरपला..

त्यांच्या अभिनयाचे कधी कधी चेष्टा व्हायची..पण त्यांची ती तीरकी हसरी मुद्राच आजही आठवणीत राहिली.अंदाज मधली त्यांची आदाकारी..अमिताभ बच्चन आणि त्यांची चित्रपटातली दृष्य़े आजही डोळ्यात पाणी आणतात.

भाउकपणा आणि आणि हळवी नजाकत ही त्यांचे वेगळेपण होते...त्यांच्या जाण्याने `जिंदगी एक सफर है सुहाना ..यहॉं कल क्या होगा किसने जाना..`हेच खरं... त्यांच्या स्मृती साठवतच हिंदी चित्रपटसृष्टी हळहळत राहिल..तसेच त्यांचे कोट्वधी चाहते...त्यांचे व्यसन त्यांना अखेरपर्य़त साथ देत गेले....दारु...य़श पचवून स्वतःला सिध्द करण्याची ताकद होती..पण..

त्यांना श्रध्दांजली!subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: