Wednesday, August 22, 2012

वेळ भरत आली आहे...


राज्य सरकारचे लेचेपेचे धोरण
नशीबी आहे महाराष्ट्राच्या
म्हणून वाढतीय गुन्हेगारी
होताहेत आंदोलने आणि निघताहेत मोर्चा
जनता रडती आहे..पावसाने बेजान झालीय
महागाईने जर्जर
आहे का त्यांना त्याची काही पडली..
ते आपल्या आरामदायी महालात पहूडलेत
पण एक दिवस त्यांचीही वेळ येईल
मग पळता भुई थोडी होईल..
मग कितीही धावा केला
तरी कुणीही ढुंकूनही पाहणार नाही..
सावधान..वेळ भरत आली आहे...-subhash inamdar,Pune


No comments: