Thursday, September 20, 2012

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आज भुवरी सकल दिशांनी तांडव ते सारे
काय करावे कुठे पहावे आम्हा नच ठावे..
तुझा आसरा म्हणून सर्वथा हेच नित्य सावे..11

 
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो


तूच विधात्या सांग ईश्वरा शरण कुणाशी जावे
त्याच राऊळा उभा राहूनी नतमस्तक आहे..
तुझ्या दर्शनातून उमले आयुष्याचे धागे..11

  
 हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतो

आजपासूनी तुझी प्रार्थना मनात मी करतो
जनात आहे तुझीच मूर्ती मनात ती स्मरतो..
हे गजवदना तुझ्यापुढे मी उभय हस्त जोडतो..11

हे गणेशा गौरीनंदना वंदन तुज करितो
दे आम्हाला अभय उद्याचे हेच एक मागतोसुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: