Monday, September 24, 2012

केवळ पहाणे तुमच्या हातात
सारं गप्प राहून पहायचे दिवस
न बोलता तोंडावर बोट ठेवा..
केवळ पहाणे तुमच्या हातात
कानानेही ऐका काही हरकत नाही..
पण वाच्यता नका करु...घायाळ व्हा..अगदी रक्तबंबाळ व्हा...
पण सांगणार कुणाला..
तुमचा कुणी वाली आहे काय...

ममता निदान थाडकन् बोलून माकळ्या तरी होतात..
केंद्रातला पाठिंबा काढून धाडस तरी दाखवितात..

आपण काय मत दिले काय किंवा न दिले काय..
मोल मिळाले मत देणा-याला
न देणा-याच्या पगारात होतात कपाती
कर, सेवाकर शिवाय आहेच इन्कमटॅक्स..

शिवाय गाडी वापरतो ना..
मग पेट्रोल भाव खिशातली पुंजी उडवतातच..
टिव्हीसाठी सेट टॉप बॉक्स घेतलाच पाहिजे
स्वतःचे घर घेतले हप्ते आहेतच...

आता विचार करु नका...
असेच जगा..
ते मात्र उडवित आहेत गाड्या
तुमच्या करांच्या पैशात..
दौरे करताहेत..
मंजूर करताहेत नवी धोरणे..
आणि मंजुरी देताहेत नव्या कामांना..

तुम्ही-आम्ही बघत रहायचे
डोळे असून..मात्र बालायचे नाही...


इति- सुभाष इनामदार,पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: